अरुण बारसकर ल्ल सोलापूर
राज्यभरात 7क् हून अधिक कंपन्या व 1क् हजारांहून अधिक डिलरच्या माध्यमातून पुरवठा होणा:या ठिबकच्या साहित्यात ‘गुणवत्तेची ऐशी-तैशी’ सुरु आहे. खपाच्या स्पर्धेत गुणवत्तेचा विचार न होता सरसकट अनुदान देण्याची पद्धत याशिवाय अनुदान मिळण्याचा बेभरवसा असल्याने ठिबक सिंचन योजना बदनाम झाली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध पिकांसाठी केल्या जाणा:या ठिबकसाठी अनुदान दिले जाते. राज्यात ठिबकचे साहित्य पुरवठा करणा:या कंपन्यांची संख्या मोठी आहे. या सर्व कंपन्यांचे राज्यभरात 1क् हजाराहून अधिक डिलर आहेत. शेतक:यांकडून काही ठराविक कंपन्यांच्या ठिबक साहित्याला मागणी आहे. गुणवत्तेचे व शेतक:यांकडून मागणी असलेले साहित्य ज्या कंपन्यांचे आहे त्या कंपन्यासोबत अन्य कंपन्यांचेही नाव शासनाच्या कृषी विभागाच्या यादीत असते. शासनाने ठरवून दिलेल्या सर्वच कंपन्यांपैकी कोणत्याही कंपनीच्या डिलरकडून ठिबक करुन घेतले तरी चालते. यामुळे शेतकरी चार पैसे वाचतील असा विचार करुन कंपनीच्या डिलरच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात व ठिबक करुन घेतात. असे ठिबक शेतात किती वर्षे चालतात, याचा नेम नाही. यामुळे ठिबकच्या अनुदानातून फार काही साध्य होत नाही.
च्मागील तीन-चार वर्षापासून राज्यभरात ठिबकचे अनुदान मिळाले नाही. सोलापूर जिल्ह्यात तर तीन वर्षाचे मोठय़ा प्रमाणावर अनुदान थकले आहे. अनुदान मिळाले नसले तरी अनेक ठिकाणी केलेले ठिबक खराब झाले आहे. प्रयोग म्हणून तपासणी केल्यास हे समोर येणार आहे. गुणवत्तेच्या कंपन्यांचे साहित्य आजही चांगल्या अवस्थेत आहेत.
प्रस्ताव घेणोच बंद केले
2क्13-14 या वर्षी ठिबक केलेले प्रस्ताव कृषी अधीक्षक कार्यालय स्वीकारत नाही. प्रस्ताव स्वीकारू नका, असे आदेश शासनाचेच आहेत. यापूर्वीच्या तीन वर्षाचेही अनुदान अद्याप आलेले नाही. एकटय़ा सोलापूर जिल्ह्याचे 6क् कोटींचे अनुदान रखडले आहे.