शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:30 IST

शाहबाज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे...

इस्रायलने शुक्रवारी सकाळच्या सुमारास इराणवर जबरदस्त हवाई हल्ला केला आहे. यानंतर आता इराण आणि इस्रायलमधील तणाव आणखीनच वाढला आहे. यातच, इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) इराणी लष्कराच्या वरिष्ठ कमांडर्सना ठार केल्याचाही दावा केला आहे. यानंतर, आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही इस्रायल-इराण युद्धात उडी घेतली आहे. त्यांनी इस्रायलवर टीका करत, हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. शाहबाज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

पाकिस्ताचे पंतप्रधान एक्सवर पोस्ट करत म्हणाले, ""मी इराणवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात झालेल्या मृत्युंबद्दल मी इराणी जनतेप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो. हे एक अतिशय बेजबाबदार आणि चिंताजनक कृत्य आहे. आधीच अस्थिर असलेल्या प्रदेशात आणखी अस्थिरतेचा निर्माण होण्याचा धोका आहे. जागतिक शांतता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृतीला रोखण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्रांना त्वरित पावले उचलण्याचे आवाहन करतो."

काय म्हणाले, इस्रायल डिफेंस फोर्स -आयडीएफने आपल्या आधिकृत 'एक्स' हँडलवर म्हटले आहे, "आता आम्ही पुष्टी करू शकतो की, इस्रायलने इराणवर केलेल्या २०० हून अधिक लढाऊ विमानांच्या हल्ल्यात इराणी सशस्त्र दलांचे प्रमुख, आयआरजीसीचे कमांडर आणि इराणच्या आपत्कालीन कमांडचे कमांडर हे सर्व ठार झाले आहेत."

आयडीएफने म्हटले आहे की, आपल्याला नुकत्याच मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, इराण अण्वस्त्र  बनण्याच्या शर्यतीत अशा बिंदूवर जाऊन पोहोचला आहे, जेथून माघारी फिरणे शक्य नाही.

इस्रायलच्या हल्ल्यानंतर, इराणनेही इस्रायलला प्रत्युत्तर दिले आहे. इराणने गेल्या काही तासांत 100 हून अधिक ड्रोन सोडले आहेत. इस्रायल डिफेन्स फोर्सचे (आयडीएफ) प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांच्या मते आयडीएफ ड्रोन्स पाडण्यासाठी काम करत आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणPakistanपाकिस्तान