शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इक्बाल कासकरला पुन्हा पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 03:19 IST

खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला सोमवारी पोलिसांनी पुन्हा कोठडीत घेतले.

ठाणे : खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला सोमवारी पोलिसांनी पुन्हा कोठडीत घेतले. ठाणेनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे.ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना सप्टेंबर महिन्यात अटक केली. एका बिल्डरची गोराई येथे ३८ एकर जमीन होती. तिच्या विक्रीचा सौदा व्यावसायिकाशी करून, त्याच्याकडून २ कोटी रुपये अग्रिम रक्कम बिल्डरने घेतली. मात्र, व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच जमिनीचे भाव वाढले. त्यामुळे बिल्डरने किंमत दुपटीने वाढवली. जमिनीचे भाव वाढले असले तरी सौदा आधीच झाला असल्याने व्यावसायिकाने वाढीव किंमत देण्यास नकार दिला. त्याने व्यवसायिकाला बाजूला करण्यासाठी एजंटशी संपर्क साधला. त्यातून इक्बालचा यात प्रवेश झाला. अग्रिम म्हणून घेतलेले २ कोटी आणि स्वत:जवळचे १ कोटी अशी एकूण ३ कोटी रुपयांची खंडणी कासकरने बिल्डरकडून उकळली. त्याच्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलिसांनी ३ आॅक्टोबर २0१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. यासाठी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने इक्बालच्या कोठडीची मागणी न्यायालयास केली. न्यायालयाने ती मान्य करून ६ मार्चपर्यंत इक्बालला पोलिसांच्या ताब्यात दिले.अनिस इब्राहिमने दिल्या होत्या धमक्याठाणेनगर पोलीस ठाण्यातील हा गुन्हा खंडणीविरोधी पथकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या गुन्ह्याच्या फिर्यादीनुसार तक्रारदारास अनिस इब्राहिमने खंडणीसाठी धमकावले होते. याशिवाय दाऊद इब्राहिमच्या नावाचा उल्लेखही या फिर्यादीमध्ये आल्याने पोलिसांसाठी या प्रकरणाचा तपास महत्त्वाचा राहणार आहे.

टॅग्स :Iqbal Kaskarइक्बाल कासकरthaneठाणेPoliceपोलिस