शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस बदली रॅकेट; संदीप बिष्णोई यांची चौकशी; दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही गुन्हे शाखेकडून तपास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 03:25 IST

आयएएस, आयपीएस अधिका-यांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्या करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणा-या रॅकेटचा गुन्हे शाखेने जून महिन्यात पर्दाफाश केला होता.

मुंबई : आयएएस, आयपीएस अधिका-यांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्या करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणा-या रॅकेटचा गुन्हे शाखेने जून महिन्यात पर्दाफाश केला होता. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. याच प्रकरणात अटकेत असलेला महानंद डेअरीचा महाव्यवस्थापक विद्यासागर हिरमुखेच्या संपर्कात आलेले एसआरपीएफचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई यांच्याकडे सोमवारी चौकशी करण्यात आली. या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.नेत्यांसह मंत्र्यांच्या मदतीने आयपीएस अधिकाºयांना पाहिजे त्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी हिरमुखे आणि त्याचे साथीदार पैसे घ्यायचे. सोलापूरचे उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात हिरमुखेसह (४७) रवींद्रसिंग महोबतसिंग यादव (५१), किशोर माळी (३८) आणि विशाल ओंबळे (४०) या चौघांना ३१ मे रोजी विमानतळ परिसरातील सहारा स्टारच्या खोली क्रमांक २०१२ मधून अटक केली होती. ही टोळी राज्य पोलीस दलातील अनेक अधिकाºयांच्या संपर्कात होती. त्यांच्यासह या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी ४७५० पानांचे दोषारोपपत्रही दाखल केले आहे. गुन्हे शाखेने हिरमुखे व साथीदारांचे मोबाइल पुढील तपासणीसाठी न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठविले होते. प्रयोगशाळेतून माहिती अहवाल हाती येताच गुन्हे शाखेने तपास सुरू ठेवला.हिरमुखेच्या चौकशीतून बिष्णोर्इंचे नाव समोर आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाºयाने दिली. मात्र त्यांचा या प्रकरणाशी नेमका काय व कसा संबंध आहे, याची सखोल चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी बिष्णोई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.बिष्णोई यांच्याकडे केलेल्या चौकशीमुळे वरिष्ठांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे समजते. या प्रकरणी आणखी काही बड्या आयएस आणि आयपीएस अधिकाºयांची चौकशी करत त्यांचेही जबाब नोंदवणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली