शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

आयपीएस अधिकाऱ्याचेच कार्यालय फोडले; डिईफेड्रीन प्रकरणाला वेगळे वळण

By admin | Updated: September 29, 2016 03:09 IST

सोलापूर येथील अ‍ॅव्हॉन लाइफ सायन्सेस कंपनीत पकडण्यात आलेले ९५०० किलोे डिईफेड्रीन या अंमलीपदार्थाच्या तपासाने वेगळेच वळण घेतले असून, या प्रकरणाचा तपास करणारे दक्षता

- अतुल कुलकर्णी, मुंबई

सोलापूर येथील अ‍ॅव्हॉन लाइफ सायन्सेस कंपनीत पकडण्यात आलेले ९५०० किलोे डिईफेड्रीन या अंमलीपदार्थाच्या तपासाने वेगळेच वळण घेतले असून, या प्रकरणाचा तपास करणारे दक्षता विभागाचे सहआयुक्त आयपीएस अधिकारी हरिश बैजल यांचेच मुंबई येथील कार्यालय फोडण्यात आले आहे. या घटनेची तक्रार एफडीए आयुक्तांकडे करण्यात आली असली, तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.दरम्यान, ज्या सात अधिकाऱ्यांना या प्रकरणात दोषी धरण्यात आले, त्यांना वाचविण्यासाठी एफडीएमधील एक मोठी लॉबी कार्यरत झाली आहे. सोलापूरच्या प्रकरणी एनडीपीएस अ‍ॅक्ट, तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ अंतर्गत कलम १८ सी अन्वये गुन्हा दाखल झाल्याचा अहवाल सोलापूर आणि ठाण्याच्या पोलीस प्रमुखांकडे स्वत: हरिश बैजल यांनी व्हिजिलन्स आॅफिसर या नात्याने तक्रार नोंदवली होती. त्यात सं. मा. साक्रीकर, भा.द. कदम, वि. रा. रवी हे औषध निरीक्षक, तसेच सहायक आयुक्त श्रीमती म. स. जवंजाळ पाटील, पुण्याचे सहआयुक्त वा. रे. मासळ, सं. वा. पाटील आणि राज्याचे नियंत्रक प्राधिकारी ओ. शो. साधवानी या सात अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या कर्तव्यामध्ये कसूर केल्याचा ठपका ठेवत, त्यांच्यावर कलम ५९ एनडीपीएस अन्वये कारवाई करावी, असेही बैजल यांनी त्या तक्रारीत म्हटले होते.त्यानंतर, एफडीएमध्ये एकच खळबळ उडाली. पकडण्यात आलेले डिईफेड्रीन हे औषध प्रशासनाच्या कक्षेतच येत नाही, अशी भूमिका घेत एफडीएने यातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न चालवला असला, तरी ही जबाबदारी एफडीएचीच असल्याचे नार्कोटिक व सायकोट्रीक सबस्टनसेस कायदा सांगतो. या कायद्याची अंमलबजावणी केली नाही, म्हणूनच एफडीएच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलेले आहे. त्यामुळे बैजल यांचे कार्यालय फोडण्यामागे ही कारवाई कारणीभूत ठरली आहे. कारण कार्यालय फोडण्यात आल्यानंतर, तेथे मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची नासधूस करण्यात आली होती. या घटनेची लेखी तक्रार त्यांनी आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्याकडे केली. मात्र, अजूनही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जाऊ लागली, म्हणून २१८ देशांनी केलेल्या अंमलबजाणीच्या सहमतीनंतर या संबंधीचा कठोर कायदा आला. त्यासाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे, पण ही जबाबदारीच आमची नाही, अशी भूमिका घेत, अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत.एफडीएचे दक्षता अधिकारी बैजल यांचे कार्यालय फोडले हे सत्य आहे. त्यांनी तशी तक्रार केली आहे. एफडीएच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश देण्यात आले असून, यासाठी एक चौकशी समिती नेमली जाईल व यातील दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. - गिरीश बापट, अन्न व औषध प्रशासनमंत्री