शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आवक कमी असल्याने उडदाचे दर ११ हजारांवर

By admin | Updated: November 18, 2015 03:22 IST

यावर्षी पाऊस कमी झाल्याने मूग, उडदाचे उत्पादन प्रचंड घटले. कमी कालावधीत येणाऱ्या उडीद, मुगाची आवक ही तीन ते चार हजार क्ंिवटलच्या वर असायची. आजमितीस राज्यात दुसऱ्या

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने मूग, उडदाचे उत्पादन प्रचंड घटले. कमी कालावधीत येणाऱ्या उडीद, मुगाची आवक ही तीन ते चार हजार क्ंिवटलच्या वर असायची. आजमितीस राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाची दररोज सरासरी ३५ ते ४० क्ंिवटल आवक असून, दर प्रतिक्ंिवटल अकरा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.मूग, उडीद हे कमी कालावधीत येणारे महत्त्वाचे पीक आहे; परंतु सलग पाच ते सात वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेचा फटका या पिकाला बसत असल्याने शेतकऱ्यांनी मूग, उडिदाचा पेरा कमी केला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये या खरीप हंगामात मूग ७०,८०० हेक्टर, तर उडीद ४५,९०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात आला होता; परंतु यावर्षीही झालेल्या अल्प पावसाचा फटका पिकांना बसल्याने एकरी २० ते ५० किलो उत्पादनच हाती आले आहे.मागील सप्टेंबर महिन्यात २,७९७ क्ंिवटल उडिदाची आवक झाली होती. आॅक्टोबरमध्ये २,५६८ क्ंिवटल आवक होती. आजमितीस या आकड्यात घसरण झाली आहे. मुगाची आवक संपूर्ण आॅक्टोबरमध्ये ४,१४५ क्ंिवटल होती. आता नोव्हेंबर महिन्यात घसरण झाली असून, प्रतिदिन ८० ते ९० क्ंिवटल आवक आहे. मुगाला प्रतिक्ंिवटल ७,९०० ते ८,२०० रुपये दर आहेत. तुरीची १७ नोव्हेंबर रोजी ६१ क्ंिवटल आवक झाली होती, तर दर ८,३०० ते ९००० हजार रूपये प्रतिक्ंिवटल होता.दरम्यान, उडिदाला ४ नोव्हेंबर रोजी ९,८०० ते १०,८०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. ६ तारखेला ९,२०० ते १०,५०० रुपये, ७ नोव्हेंबरला ९,५०० ते १०,००० रुपये, तर १६ नोव्हेंबरला १०,००० ते ११,२०० आणि १७ नोव्हेंबरला ९,८०० ते ११,००० रू पये दर होता. जशी आवक घटत आहे, तसे दर चढत असल्याचे या आकड्यांवरू न लक्षात येत आहे.मूग, उडिदाची आवक अपेक्षेपेक्षा कमी असून, उडिदाला प्रतिक्ंिवटल ११,००० रुपये, तर मुगाला ८,२०० रुपये दर मिळत आहे.-सुनील मालोकार, सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोला.