शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

निमंत्रितांना मानधन नाही, इच्छुकांनी स्वखर्चाने यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 04:53 IST

बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणा-या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाºया निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन...

नागपूर  - बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणा-या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाºया निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. त्यांच्या आवाहनाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही दुजोरादिला.संमेलनात होणा-या विविध कार्यक्रमांची माहितीही या वेळी देण्यात आली. संमेलनाच्या परिसराला ‘महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, गुजरातचे शिक्षणमंत्री चुडासमा उपस्थित राहणार आहेत.संमेलनात एकाच परिसरातील विविध स्थळांवर चार परिसंवाद, कविसंमेलन, मान्यवरांचे काव्यवाचन, बोलीतील कविता, स्थानिकांचे बहुभाषिक संमेलन, प्रतिभावंतांचा सहवास, कथा-कथाकार, कथानुभव, टॉक-शो या अभिनव कार्यक्रमांचे आयोजन.मराठी भाषेचे वैभव व गौरवाचे दर्शन घडविणारा ‘मराठी भाषा सुंदरी’ हा कार्यक्रम होणार आहे. ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, संगीत पहाट, शास्त्रीय गायन आदी कार्यक्रम होणार आहेत. संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या कार्य-कर्तृत्वाचे सांगीतिक दर्शन, बडोद्याच्या स्थानिक कलावंतांचा सहभाग असलेले बडोदा कलावैभवसोबतच कविकट्टा, प्रकाशन मंच, प्रकाशकांचा मेळावा होणार आहे.साहित्य क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रियानिमंत्रितांना मानधन व प्रवासभत्ता न देण्याबद्दल साहित्य क्षेत्रातून तीव्र नापसंतीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मानधन हा साहित्यिकांचा सन्मान आहे, आयोजक तो कसा नाकारू शकतात. क्षमता नसेल तर हा शिवधनुष्य हातात घेतला कशाला, असा प्रश्नही विचारला जात आहे.

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र