शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दावोसमधून राज्यात आणणार अडीच लाख कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसह दहा अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 07:07 IST

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सोमवारपासून जागतिक आर्थिक परिषद सुरू झाली असून ती १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात सहभाग घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिष्टमंडळासमवेत प्रयाण करणार आहेत.

मुंबई : दावोस परिषदेच्या माध्यमातून राज्यात सुमारे अडीच लाख कोटींची प्रत्यक्ष गुंतवणूक आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पोलाद, माहिती तंत्रज्ञान,  आण्विक ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत-ग्रीन हायड्रोजन,  हिरे व आभूषणे, डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स, ऑटोमोटिव्ह  त्याचबरोबर कृषी-औद्योगिक, कृषी आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, त्यानुसार तीन लाख १० हजार कोटी रुपयांचे २० सामंजस्य करार केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सोमवारपासून जागतिक आर्थिक परिषद सुरू झाली असून ती १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात सहभाग घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिष्टमंडळासमवेत प्रयाण करणार आहेत. 

गतवर्षी १ लाख, ३७ हजार कोटींचे करार मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असून गेल्यावर्षी या परिषदेत  १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी ७६ टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत.

शाश्वत विकासावर मुख्यमंत्र्यांचे भाषण १७ जानेवारीस गौतम अदानी यांची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट असून त्यानंतर मुख्य कार्यक्रमात काँग्रेस सेंटरमध्ये ‘नागरी  क्षेत्रातील आव्हाने, नावीन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास’ या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले भाषण देतील. याशिवाय ‘कृषी, महिला सहभाग व अन्न सुरक्षा’ या विषयावर ठेवण्यात आलेल्या चर्चासत्रात  सहभागी होतील.

कुठे येणार उद्याेग?उद्योग राज्यात केवळ मुंबई, पुणे भागात न येता छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, जालना, रायगड अशा सर्वदूर ठिकाणी येतील, यादृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. १८ तारखेस ‘सीआयआय’ने गोलमेज परिषद आयोजित केली असून, त्याला  केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. 

महाराष्ट्राचे प्रभावी ब्रँडिंग करणार१६ जानेवारीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन करण्यात येईल. ओमानचे उद्योग मंत्री, सौदीचे वित्तमंत्री, दक्षिण आफ्रिकेचे ऊर्जामंत्री, दक्षिण कोरियाच्या ग्योगी प्रांताचे गव्हर्नर, तसेच डीपी वर्ल्ड, लुईस ड्रेफस,  वित्कोविझ एटोमिका, या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा होईल. जागतिक आर्थिक परिषदेचे कृषी आणि अन्नप्रक्रिया गटाचे सदस्य देखील मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या परिषदेसाठी यंदाही भारताच्या दालनाच्या जवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असे दालन (पॅव्हेलियन) उभारण्यात आले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्र