शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधित शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी ‘एसआयटी’द्वारे तपास, तीन आठवड्यांत शासनाला अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 17:16 IST

पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांत ५०० वर शेतक-यांना विषबाधा होऊन २० शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला.

अमरावती - पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांत ५०० वर शेतक-यांना विषबाधा होऊन २० शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रकरणाच्या तपासासाठी शासनाने शुक्रवारी विशेष तपास पथक गठित केले आहे. अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंग पथकाचे प्रमुख आहेत. हे सात सदस्यीय पथक तपास करून तीन आठवड्यांच्या आत शासनाला अहवाल देणार आहे.

ही तपास समिती मानव निर्मित आपत्ती घडण्यासाठी कारणीभूत  ठरलेल्या बाबी निश्चित करून त्याबाबत प्रतिबंधात्मक शिफारशी देणार आहे. यामध्ये कायद्यात तरतुदीची अंमलबजावणी करताना घडलेल्या चुका त्याकरिता जबाबदार व्यक्ती, संस्था व शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी निश्चित करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात बिगरपरवाना कीटकनाशकाचे विक्री प्रकरणी झालेली कार्यवाही तसेच कीटकनाशकांचे नमुने अप्रमाणित आढळून आलेल्या प्रकरणांमध्ये करण्यात आलेल्या कार्यवाहीचे गुणात्मक विश्लेषण करून शासनाला शिफारशी देणार आहे.

सध्या विक्री असलेले काही कीटकनाशके, स्प्रेपंप इत्यादीच्या विक्रीवर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्यास त्याबाबत शासनाच शिफारशी करणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात याप्रकारच्या घटनांबाबत अहवाल देण्याच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार ताज्य शासनांच्या प्रशासकीय विभागांना अहवाल सादर न करण्यासंदर्भात झालेल्या उणिवा शोधून काढणार असून त्यासाठी जबाबदार असणा-याविभागाची माहिती निश्चित करणार आहे. या दुर्घटनेबाबत जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे करण्यात आलेले संनियंत्रण, देखरेख तसेच घटनेनंतर भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता तातडीने करावयाच्या कार्यवाहीबाबत शासनाला तीन आठवड्यांत शिफारशी करणार आहे.

विशेष तपास पथकात या सदस्यांचा समावेशशासनाने स्थापित केलेल्या विशेष पथकाचे प्रमुख विभागीय आयुक्त पीयूष सिंग आहेत, तर विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे सचिव आहेत. या पथकात अमरावतीचे विशेष पोलीस महासंचालक, आरोग्य उपसंचालक, अकोला कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागप्रमुख, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोघन संस्थेचे संचालक व फरिदाबाद येतील डायरेक्टोरेट ऑफ प्लांट प्रोटेक्शन, क्वारेनटाईन अँड स्टोरेज हे सदस्य आहेत.