मुंबई : विक्रोळी टागोरनगर परिसरात एटीएम लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अनोळखी लुटारूविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.विक्रोळी टागोरनगर क्रमांक १ मध्ये डीसीबी बँकेचे एटीएम सेंटर आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही लुटारूंनी येथील एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीन पूर्णपणे तोडण्यात आले. मात्र त्यांना पैसे काढण्यात यश आले नाही. सकाळी पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकाला एटीएम लुटण्याचा प्रयत्न झाल्याचे समजले. त्याने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची वर्दी लागताच विक्रोळी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. परिसरातील दुकानदार, रहिवासी तसेच भाड्याने राहत असलेल्या नागरिकांकडेही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहेत.
विक्रोळीत एटीएम लुटण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल;तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 02:51 IST