शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून काढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 05:34 IST

कुटुंबीयांची उच्च न्यायालयाकडे मागणी : अर्ज करण्याचे निर्देश

मुंबई : गोविंद पानसरे हत्येचा तपास एसआयटीकडून काढून घ्यावा, अशी मागणी पानसरे कुुटुंबीयांनी उच्च न्यायालयात सोमवारी केली. त्यावर न्यायालयाने पानसरे यांच्या कुटुंबीयांना तसा अर्ज करण्याचे निर्देश दिले.

तपासात काही प्रगती न झाल्याने न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने नाराजी दर्शविली. ‘दुसऱ्या तपास यंत्रणांवर विसंबून राहू नका. तुम्ही स्वतंत्रपणे तपास करा,’ असे न्यायालयाने एसआयटीला बजावले. त्यावर सरकारी वकील अशोक मुंदर्गी यांनी सांगितले की, कोल्हापुरातील पूरस्थितीमुळे एसआयटी दीड महिने तपास करू शकली नाही. दाभोलकर व कलबुर्गी हत्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींकडून पानसरे हत्येचे धागेदोरे हाती लागत आहेत का, याचा तपास एसआयटी करत आहे. दाभोलकर यांच्या हत्येतील पिस्तूल ठाणे खाडीत टाकल्याची माहिती शरद कळस्करने सीबीआयला दिली होती. ते शोधण्यासाठी परदेशातून डायव्हर्स मागविले. ते हाती न लागल्याने शोधासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती सीबीआयने न्यायालयाला केली. मुदतवाढ मिळेल, परंतु आरोपपत्र दाखलच्या मुदतीधी शोध संपवा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.आरोपींवर महिन्यात आरोपपत्र दाखल करू - सीबीआयआरोपी अ‍ॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रांत भावे यांच्यावर एका महिन्यात आरोपपत्र दाखल करू, अशी माहिती सीबीआयने उच्च न्यायालयात दिली. पुनाळेकरवर आरोपी शरद कळसकर याला शस्त्र नष्ट करण्यासाठी मदत केल्याचा तर भावे याच्यावर रेकी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरे