शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 08:33 IST

लाखो टन मासळीची अवैध लूट, राज्यभरातील मच्छीमारांमध्ये पसरली असंतोषाची लाट

मधुकर ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्कउरण : महाराष्ट्रातील लाखो मच्छीमारांनी महिनाभरापूर्वी मासेमारीला सुरुवात केली असतानाच चीनच्या ६०० अवाढव्य फॅक्ट्री जहाजांसह परप्रांतीय मच्छीमार बोटींनी राज्याच्या सागरी हद्दीत हैदोस घालत लाखो टन मासळीची लूट सुरू केली आहे.

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत विदेशी व परप्रांतीय मच्छीमारांना मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र, राज्याचा बंदी कायदा झुगारून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात या परराज्यांतील शेकडो मच्छीमार बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसखोरी करीत आहेत. परप्रांतातून येणाऱ्या ४२७ हाॅर्सपाॅवरपर्यंत क्षमतेच्या मासेमारी बोटी मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जयगड या हद्दीत अक्षरश: धुडगूस घालून लाखो टन मासळी लुटून नेत आहेत.

अवैध मासेमारीराज्यातील मच्छीमार व्यवसाय विविध समस्यांमुळे कोलमडला आहे. मागील महिनाभरात वादळ, जोरदार पाऊस, खराब हवामानामुळे काही दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यात या अवैध मासेमारी करणाऱ्या चिनी व परप्रांतीय मच्छीमारांची भर पडली आहे. 

२०० सागरी नॉटिकल मैलाच्या आत शिरकावचीनच्या हजारो टन क्षमतेच्या ५०० ते ६०० अवाढव्य फॅक्ट्री जहाजांची राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी झाली आहे. २०० सागरी नॉटिकल मैलाच्या आतही ५० ते १०० मीटर लांबीच्या व हजारो टन साठवणूक क्षमता असलेल्या मासेमारी करणाऱ्या जहाजांना नौदलालाही ओळखणे कठीण होते. चीनची जहाजे पकडली तरी ते कोणती ठोस कारणे देत सुटका करून घेतात, हा प्रश्नच आहे.

"चीनच्या मच्छीमार बोटी स्थलांतरित होणारे मासे मोठ्या प्रमाणावर पकडतात. यामुळे राज्यातील मच्छीमारांचे नुकसान होते", अशी माहिती वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट फिशिंग असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी दिली. "कारवाईअभावी परप्रांतीय मच्छीमार बोटींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. घुसखोरीची दृश्य व्हेसल ट्रॅकर सिस्टमवरही दिसतात. मात्र, कारवाईच होत नाही", असे वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट फिशिंग असोसिएशन संचालक रमेश नाखवा म्हणाले.

टॅग्स :fishermanमच्छीमारMaharashtraमहाराष्ट्र