शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

पुनर्मूल्यांकनास शाळांकडून अडथळा

By admin | Updated: June 10, 2016 01:08 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीचा निकाल जाहीर करण्यात आले

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीचा निकाल जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांना छायांकित प्रती व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या संदर्भातील प्रस्ताव शाळांच्या मार्फत विभागीय मंडळाकडे पाठविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे संबंधित शाळेच्या वर्गशिक्षकांना छायांकित प्रत दाखविणे आवश्यक आहे. मात्र, शाळांकडून विद्यार्थी व पालकांना सहकार्य केले जात नसल्याचे समोर आले आहेत.राज्यमंडळाने दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तत्काळ उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती देण्यास तसेच पुनर्मूल्यांकन्याचे प्रस्ताव स्वीकारण्यास सुरूवात केले आहे. राज्य मंडळाने त्यासाठी वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. त्यामुळे ठराविक कालावधीमध्येच छायांकित प्रत घेवून विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्याने आपल्या शाळेतून यासंदर्भातील प्रस्ताव पाठविणे बंधनकारक आहे. परंतु, काही शाळांकडून पालकांना व विद्यार्थ्यांना शाळेबाहेरच उभे केले जाते. उडवाउडवीची उत्तरे देऊन हाकलून दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एका पालकाने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे याबाबत लेखी तक्रार दिली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाचे प्रस्ताव शाळेमार्फत मंडळाकडे पाठवावे लागतात. परंतु, काही शाळांकडून विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा चुकीची वागणूक देत असल्याचे समोर आले आहे. एका पालकाने दस्तूर शाळेबाबत लेखी तक्रार दिली आहे. मंडळाकडे पुनर्मूल्यांकनाचे प्रस्ताव योग्य वेळेत गेले नाही तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सोईसाठी शाळेत हजर राहणे आवश्यक आहे. कोणत्याही शाळेबाबत विद्यार्थ्यांची तक्रार आल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.