शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:34 IST

International Yoga Day: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही मुंबईत सफाई कामगारांसाठी आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी अमृता फडणवीस यांनी त्यांचे पती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं विधान केलं.

आज आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह जगभरात उत्साहात साजरा करण्यात आला. भारतामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही मुंबईत सफाई कामगारांसाठी आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी अमृता फडणवीस यांनी त्यांचे पती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं विधान केलं.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, आज इथे मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आम्ही सुंदर योग शिबिराचं आयोजन केलं. या सर्वांचं योगा सत्र सुरू आहे. अधिकारी भूषण गगराणी यांच्यासह इतर काही सेलेब्रिटी उपस्थित आहेत. आम्ही सर्वांनीही त्यांच्यासोबत योगा करत आहोत. योग हा केवळ एक दिवस करायचा नाही आहे तर रोज करायचा आहे. त्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आयोग्य जन्मभर चांगलं राहील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस हे खूप संयमी दिसतात, त्यामागेही योग हे कारण आहे का? असं विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्रजीही योगीच आहेत. कारण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते ध्यानधारणा नेहमीच करतात. ते कसरत करत नाहीत, पण ध्यानधारणा नक्कीच करतात, अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. यावर्षी ११ वा योगदिन जगभरात साजरा झाला आहे. 

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनAmruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस