शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय विवाह : जात-धर्माच्या पलीकडे नेणारा आश्वासक प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 05:41 IST

जात निर्मूलनासाठी आंतरधर्मीय विवाहांच्या आवश्यकतेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भर दिला होता. त्या प्रयत्नांची आज मोठी गरज आहे.

डॉ. हमीद दाभोलकर, कार्यकर्ता, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

भारतीय नागरिकांच्या आयुष्यातील खूप सारे निर्णय हे जात आणि धर्म या दोन गोष्टींच्या भोवती फिरत असतात ही नाकारता येऊ शकेल अशी गोष्ट नाही. अगदी प्रत्येक निवडणुकीतही आपल्याला याचा अनुभव येतो. जात आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपले जीवन आणि सार्वजनिक व्यवहार असावेत याविषयी अनेक वेळा चर्चा होते; पण प्रत्यक्षात त्या दिशेने कार्य करताना मात्र अनेक अडचणी येतात.

यासाठी आंतरजातीय/धर्मीय विवाह हा जात आणि धर्माच्या पलीकडे जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील त्यांच्या 'अनहिलेशन ऑफ कास्ट' या ग्रंथात आंतरजातीय विवाहांमुळे जात निर्मूलनाच्या दिशेने कसे पाऊल पडू शकते हे नमूद केले आहे. आंतरजातीय/धर्मीय विवाहांमुळे जात आणि धर्मात मोकळेपणा येऊ शकतो. साहचर्य आणि सामंजस्य वाढू शकते.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसमार्फत नुकतेच आंतरजातीय धर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी वधू-वर सूचक मंडळ चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जात ही कुठलाही वैद्यानिक आधार नसलेली अंधश्रद्धा आहे, असे डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणत असत. अंधश्रद्धा निर्मूलनाइतकेच ते जाती-अंताच्या लढाईविषयीदेखील आग्रही असत, जवळजवळ गेली दोन दशके महाराष्ट्र अंनिस ही आंतरजातीय/धर्मीय विवाहांना पाठबळ देणारी यंत्रणा राबवते. आजपर्यंत अशा शेकडो विवाहांना अंनिस कार्यकर्त्यांनी पाठबळ दिले आहे. अनेक ठिकाणी अशा लग्नांना दोन्ही बाजूंच्या घरच्या लोकांचा टोकाचा विरोध असतो. त्यामधून या तरुणांच्या जिवाला धोकादेखील होऊ शकतो, अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या 'सेफ हाऊस गाइड लाइन 'प्रमाणे महाराष्ट्रातील पहिले 'सेफ हाऊस' अंनिसने चालू केले आहे. आंतरजातीय/धर्मीय वधू-वर सूचक मंडळ हे याच प्रयत्नातले पुढचे पाऊल आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ज्या विवाह इच्छुक व्यक्तींना आंतरजातीय/धर्मीय विवाह करण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांच्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करून नोंदणी करायची आहे. महाराष्ट्र अंनिस मध्यवर्ती कार्यालयात हे सगळे नोंदणी झालेले फॉर्म एकत्र करून तेथून हे वधू-वर सूचक केंद्र चालेल. यासाठी वेबसाइट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढे यासंदर्भात स्वतंत्र अॅपदेखील तयार केले जाणार आहे. समाजात जसे स्वयंप्रेरणेने आंतरजातीय/धर्मीय विवाह करणाऱ्यालोकांचे प्रमाण वाढेल तसे जातीच्या आणि धर्माच्या भिंती ढासळू लागतील, अशी अपेक्षा आहे आणि त्याला आधारही आहे. एकमेकांना समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वयंजातीचा/धर्माचा वृथा अभिमान, आपलीच जात/धर्म सर्वश्रेष्ठ आहे ही समजूत.. अशा अनेक गोष्टींना हळूहळू तडे जाऊ लागतील, महाराष्ट्र अंनिसमार्फत पाठबळ देण्यात आलेल्या अनेक आंतरजातीय/धर्मीय जोडप्यांमध्ये हे घडताना दिसून आले आहे. जाती-धर्माच्या भिंती गळून पडताना दिसून आले आहे. जाती/धर्माच्या पलीकडे जाऊन हे लोक माणूस म्हणून एकमेकांशी संवाद करू शकतात त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या पुढच्या पिढीवर देखील होताना दिसतो असा अनुभव आहे. ही फारच सकारात्मक गोष्ट आहे.

हा उपक्रम केवळ आंतरजातीय/धर्मीय विवाहांपुरता मर्यादित न राहता अशा प्रकारे होणाऱ्या सर्व विवाहांमध्ये आपला जोडीदार विवेकी पद्धतीने निवडणे आणि परिचयोत्तर विवाह यांना प्राधान्य ही गोष्ट महत्त्वाची आहे. ही प्रक्रिया दोन्ही व्यक्तींच्या निर्णय स्वातंत्र्याचा संपूर्ण आदर करून होणे अपेक्षित असते. हे विवाह शांततामय, प्रेमळ मार्गाने कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन, महात्मा फुले यांनी सांगितलेल्या सत्यशोधक पद्धतीने अथवा विशेष विवाह नोंदणी कायद्यामार्फत होणे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. आपल्या समाजात जात आणि धर्माच्या जाणिवा अत्यंत खोलवर रूजलेल्या आहेत. केवळ आंतरजातीय/धर्मीय विवाह केल्याने त्या लगेच नष्ट होतील अशी भाबडी अपेक्षा यामध्ये नाही; पण जाती आणि धर्माच्या भिंती अधिकाधिक उंच होत असलेल्या या कालखंडात जात-धर्माच्या पलीकडे जाणारा समाज निर्माण करण्यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. 

टॅग्स :marriageलग्न