शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

क्रिकेट बेटिंगचे जाळे आंतरराज्य : देशमुख

By admin | Updated: February 13, 2015 01:14 IST

पथके रवाना : टाकाळ्यातील बेटिंग कारवाईची व्याप्ती वाढली; उद्या अटक होणार

कोल्हापूर : राजारामपुरी-टाकाळा परिसरातील फ्लॅटवर राजारामपुरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातील क्रिकेट बेटिंग प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. भोपाळ, सोलापूर, लातूर, पिंपरी, नागपूर या ठिकाणी तसेच कोल्हापुरातील सहा ठिकाणी बेटिंग झाल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. यावरून क्रिकेट बेटिंगचे हे जाळे आंतरराज्यीय असल्याचे स्पष्ट होत आहे. क्रिकेट बेटिंग प्रकरणात सहभागी असणाऱ्यांना उद्या, शनिवारी अटक होणार असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी सांगितले.२२ जानेवारीला राजारामपुरी टाकाळा परिसरात एका फ्लॅटवर आॅस्ट्रेलिया व इंग्लंड या क्रिकेट सामन्याचे बेटिंग घेत असताना संशयित प्रकाश श्रीचंद जग्याशी (वय ४०), लक्ष्मण सफरमल कटयार (२७, दोघे राहणार प्रेमप्रकाश मंदिरजवळ, गांधीनगर, ता. करवीर) यांना अटक केली होती व त्यांच्याकडून सुमारे ४० मोबाईल, लॅपटॉप, एलईडी, मोबाईल, प्रिंटर, वॉकमन, मोटारसायकल असा सुमारे १ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी संशयित व फ्लॅटमालक महापालिकेचे विरोधी पक्षनेते संशयित मुरलीधर पांडुरंग जाधव हा पसार झाला होता. चार दिवसांपूर्वी संशयित जाधवला पोलिसांनी अटक केली. उद्यापासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तसेच या प्रकरणाचा छडा याचे आव्हान पोलिसांना आहे. त्यानुसार टाकाळा येथे टाकलेल्या छाप्यात सापडलेले ४० मोबाईल, त्या मोबाईलमध्ये असलेल्या नंबरवरून तपास केला आणि गुप्त बातमीदारानुसार क्रिकेट बेटिंग प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना सापडले. प्राथमिक तपासामध्ये भोपाळ (मध्यप्रदेश), सोलापूर, नागपूर, पिंपरी, लातूर तसेच कोल्हापुरातील सहा बेटिंगवाल्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले.क्रिकेट बेटिंग प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, त्याची पाळेमुळे खोदून काढणार आहे. या प्रकरणाच्या शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत.- अमृत देशमुख, पोलीस निरीक्षक राजारामपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर.