शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली यापुढे होणार नाही, शालेय शिक्षण विभागाने काढले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 07:39 IST

आंतरजिल्हा बदली हवीच असल्यास नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार असून नव्याने अर्ज करावा लागेल. 

मुंबई : शिक्षकांची ३० हजार पदे भरण्याचा निर्णय घेतानाच शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदलीबाबत कठोर निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे शिक्षकांना आंतरजिल्हा बदली घेता येणार नाही. नवीन भरतीतील शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदली करताना जुन्या शिक्षकांनाही जिल्हा निवडण्याची एकमेव संधी देण्यात आली आहे. आंतरजिल्हा बदली हवीच असल्यास नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार असून नव्याने अर्ज करावा लागेल. ज्या जिल्ह्यात भरती निघेल त्या जिल्ह्यात अर्ज करून शिक्षकांकडून नाेकरी पटकावली जाते. मात्र, एकदा नोकरी मिळाली की आपल्याला हव्या त्या जिल्ह्यात पुन्हा बदली करून घेतली जाते. यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांत पदे रिक्त राहतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षण सेवकांचे मूल्यमापन होणारशिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या शिक्षकाच्या सेवेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या स्तरावर संयुक्त समिती गठित करण्यात येणार आहे.

अन्यायकारक निर्णय२०१७ पासून ऑनलाइन बदल्या सुरू झाल्या असून त्या अत्यंत पारदर्शकपणे सुरू होत्या. असे असताना अचानक आंतरजिल्हा बदल्या रद्द करून सरकारने शिक्षकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला आहे. अशा प्रकारे जिल्हाअंतर्गत बदल्या रद्द करणे अन्यायकारक आहे.- संतोष पीट्टलवाड, शिक्षक सहकार संघटना, अध्यक्ष, महाराष्ट्र

टॅग्स :Teacherशिक्षक