शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पंढरपुरातील चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 22:53 IST

पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची श्रध्दास्थान असणारी चंद्रभागा होणार स्वच्छ, भाविकांचा अंघोळ व स्वच्छतागृहाचाही प्रश्न सोडविण्यासाठी सरकार एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले. यासबंधी लक्षवेधी आ.डॉ.नीलम गो-हे यांनी सभागृहामध्ये मांडला.  

नागपूर : पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची श्रध्दास्थान असणारी चंद्रभागा होणार स्वच्छ, भाविकांचा अंघोळ व स्वच्छतागृहाचाही प्रश्न सोडविण्यासाठी सरकार एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले. यासबंधी लक्षवेधी आ.डॉ.नीलम गो-हे यांनी सभागृहामध्ये मांडला.  दक्षिणेची काशी म्हणून महाराष्ट्रातील पंढरपूर हे ओळखले जाते. वर्षभर पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते, आषाढी कार्तिकेला तर पंढरपूरमध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळते, त्यामुळे पायाभूत सुविधांचा बोजवारा उडतो. चंद्रभागा नदीकडे भाविक एक श्रद्धास्थान म्हणून पाहतात. मात्र अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर दिनांक १६ मे, २०१८ पासून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला व चंद्रभागेमध्ये स्नान करण्याकरता भाविकांची अलोट गर्दी झाली असताना नदीच्या पात्रात मैलामिश्रित पाणी असल्याचे भाविकांना जाणवले होते, दुर्गंधीयुक्त व दूषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका तसेच तीरावर खड्डे खणले असल्यामुळे त्या खड्यामध्ये अनेक लहान मुले, महिला, पुरुष भाविक दगावण्याची शक्यता आहे. तसेच येथे निर्माल्य कुंड असावे तेही नाही. हे आ.डॉ.नीलम गो-हे  यांच्या लक्ष्यात आल्याने त्यांनी आज सभागृहामध्ये यासबंधी लक्षवेधी मांडला.यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की, पंढरपूरमध्ये जेवढे सांडपाणी तयार होते त्यातुलनेत सांडपाण्याचा निचरा करणार प्रकल्प कार्यान्वित नाही. सध्या १५.५० एमएलडी सांडपाण्याचा निचरा करणारी यंत्रणा आहे. मात्र सध्या ८ एमएलडी सांडपाण्याचा निचरा सध्या होतोय.  म्हणून २०४९ पर्यंत या शहराची सांडपाण्याचा निचरा होण्याची गरज लक्ष्यात घेता "एकात्मिक विकास प्रकल्प" राबविण्यात येणार आहे. यात ५९.७५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. यातुन ६६ किलोमीटर ची नवीन अंडरलाईन सांडपाणी नेणारी पाईपलाईन करण्यात येऊन या पाण्यावर प्रक्रिया करून पुन्हा उपयोगात आणण्यात येणार आहे. तसेच भीमा व चंद्रभागा नद्यांमध्ये दौंड, शिरूर आणि बारामती ईंदापूर, पुणे, पिंपरी चिंचवड या व इतर शहरातून दूषित पाणी नदीत सोडले जाते आहे या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध योजने अंतर्गत निधी देण्यात आला आहे. तसेच पंढरपूर नगरपालिका आणि पंढरपूर देवस्थान समिती यांनी कचरा व्यवस्थापन करण्यासाठी खाजगी संस्थांच्या माध्यमातून नदी पात्रातील  कचरा उचलण्यासाठी नेमली आहे.

नीलम गो-हे  यांनी उपस्थित केलेले उपप्रश्न...१) सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ड्रेनेज क्षमता वाढविण्यासाठी लागणाऱ्या ६८ दशलक्ष निधी कधी देणार?२) चंद्रभागेत वाळू उपशामुळे व पाणी साठविण्यासाठी खड्डे खणले जातात त्यामध्ये अनेक भाविक दगावले आहेत, त्या संबंधी काय उपाययोजना करणार?३) महिलांना अंघोळीसाठी तयार केलेल्या स्नानगृहे उपलब्ध नाहीत आणि तात्पुरते उभारण्यात आलेले स्नानगृहे उडून गेले आहेत, त्यावर काय उपाययोजन करणार?

टॅग्स :Pandharpurपंढरपूरnagpurनागपूर