शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकारमधील भाजप मंत्र्यांकडे असणाऱ्या अधिकाऱ्यांना न घेण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 06:51 IST

भाजप सत्तेवर असताना त्यांनीही असाच निर्णय घेतला होता.

- अतुल कुलकर्णी मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांकडे असणारे अधिकारी, खाजगी सचिव, ओएसडी यांना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी आपल्या आस्थापनेवर घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. भाजप सत्तेवर असताना त्यांनीही असाच निर्णय घेतला होता. तोच आता त्यांच्याच कार्यकाळातील अधिकाºयांना अडचणीत आणणारा ठरला आहे.जे अधिकारी दहा वर्षे मंत्री आस्थापनेवर कार्यरत होते त्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवावे असा आदेश तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्तेवर येताच काढला होता. त्यामुळे २०१४ साली काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकाळात जे अधिकारी मंत्री आस्थापनेवरहोते त्यांना मंत्र्यांकडे काम करता आले नाही. पुढे १० वर्षाचा कालावधी रद्द करुन तो पाच वर्षे केला गेला. तसा शासन आदेशही काढलागेला. तो अजुनही अस्तित्वात आहे. त्यामुळे त्या आदेशानुसारही जे अधिकारी पाच वर्षे मंत्री आस्थापनेवर होते त्यांना या सरकारमध्ये कोणत्याही मंत्र्यांकडे काम करता येणार नाही. तसे करु द्यायचे असेल तो आदेश रद्द करावा लागणार आहे.सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भूसे या पूर्वाश्रमीच्या मंत्र्यांना महाविकास आघाडीतही मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे तो आदेश त्यांनाही लागू होतो. मात्र भाजपच्या मंत्र्यांनी जुन्या सरकारमधील काही अधिकाऱ्यांना ‘लोन बेसीसवर’ आपल्याकडे घेतले होते तसे या मंत्र्यांना आदेश कायम ठेवायचा असेल तर करावे लागेल. हे सरकार स्थिर होऊ नये यासाठी आघाडीतील नाराज आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. त्यांना फूस लावण्याचेही प्रयत्न होत आहेत, अशावेळी मावळत्या सरकारमधील भाजप मंत्र्यांकडे असणारे अधिकारी जर विद्यमान मंत्र्यांनी घेतले तर या सरकारमधील सगळी माहिती आयतीच भाजप नेत्यांना मिळेल, त्यामुळे स्थीर होऊ पहात असलेल्या सरकारपुढे अडचणी वाढतील. हे होऊ द्यायचे नसेल त्या अधिकाऱ्यांना दूर ठेवा अशा सूचना मंत्र्यांना देण्यात आल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जर हे अधिकारी ठेवायचे असतील तर फडणवीस यांनी काढलेला शासन आदेश रद्द करावा लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा