शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना धन-दौलतीऐवजी संस्कारांचा वारसा द्या!

By admin | Updated: May 23, 2016 04:34 IST

मुलांना शाळेत जरूर पाठवा; पण ‘घरातली शाळा’ बंद करू नका. कारण आई-वडील हे मुलांसाठी विद्यापीठ असते. मुलांना धनदौलत, मालमत्ता, इस्टेट वगैरे काही दिले नाही तरी चालेल

नाशिक : मुलांना शाळेत जरूर पाठवा; पण ‘घरातली शाळा’ बंद करू नका. कारण आई-वडील हे मुलांसाठी विद्यापीठ असते. मुलांना धनदौलत, मालमत्ता, इस्टेट वगैरे काही दिले नाही तरी चालेल; पण त्यांना संस्कारांचा वारसा मात्र आवर्जून द्या. कारण तीच जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, असे आवाहन खासदार तथा ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केले. नाशिक वसंत व्याख्यानमालेचे बाविसावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. आपल्या शांत पण ओघवत्या शैलीतील वक्तृत्वातून दर्डा यांनी उपस्थितांना स्वत्त्वाची जाणीव करून दिली. गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर मूळचंदभाई गोठी यांच्या स्मरणार्थ झालेल्या या व्याख्यानात त्यांनी ‘मैं कौन हूॅँ, मैं क्या हूॅँ’ या विषयावर मार्गदर्शन केले. आयुष्यातील अनुभवांपासून भाषणाला प्रारंभ केल्यानंतर दर्डा यांनी या विषयाला व्यापक स्तरावर नेऊन ठेवले. ते म्हणाले, आपण कोण आहोत आणि या जगात का आलो आहोत, याचा तुम्ही कधी विचार केला? मी या जगात आलो की आणला गेलो? जर आणला गेलो असेल तर त्यामागे काही निश्चित उद्देश असेल. हा उद्देश शोधण्याची गरज आहे. तुम्ही डोळे बंद करून स्वत:च्या अंतरंगात डोकावून पाहा आणि स्वत:ला प्रश्न विचारा. तुम्हाला अनेकविध भावना, माणसे, घटना जाणवतील; पण स्वत:साठी किती जगलात, की आयुष्यभर दुसऱ्यासाठीच वेळ दिला, याचीही जाणीव होईल. माझे वडील स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांनी आम्हा भावंडांचे अत्यंत वेगळ्या रीतीने पालनपोषण केले. त्यांनी आम्हाला ठरवून महापालिकेच्या शाळेत घातले. तिथल्या शिक्षकांच्या कपड्यांवर ठिगळे लावलेली असायची; पण त्यांच्यातल्या आत्मविश्वासाने आम्हाला संस्कार दिले. आज आपल्याकडे सारे काही आहे, फक्त संस्कार नाहीत. ते असते तर वृद्धाश्रम नसते. आम्ही जैन साध्वी प्रीतिसुधाजी म. सा. यांची प्रवचनमाला घेतली, तेव्हा त्यासाठी आई, भाऊ, बहीण, पती-पत्नीतील नाते असे साधे-सोपे विषय ठेवले. दहा हजार लोक बसतील एवढा मंडप उभारला, तेव्हा प्रीतिसुधाजींनी ‘एवढी माणसे येतील का’ असे विचारले. त्यावर आम्ही त्यांना सांगितले की, ‘जरुर येतील.’ अन् खरोखरच त्यांचे विचार लोकांना एवढे भावले की, अनेकांनी आपण आपल्या भाऊ, बहीण, सासूशी वाईट वागल्याची स्वत:हून कबुली दिली. एवढेच नव्हे, भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हेसुद्धा खास प्रवचन ऐकण्यासाठी आले. संवेदना, संस्कारांत ही शक्ती असते. आपण मंदिरांत जातो आणि देवाकडे काही ना काही मागत बसतो. लोक दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करून टाकतात; पण माता-पित्याच्या रूपाने आपल्या घरात देव बसले आहेत, हे आपण विसरून जातो. आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवून स्वत:च्या मुलाकडून आपल्याला सांभाळण्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ‘मैं बनूंगा तुम कभी,तुम मैं कहलाओगे...जब जब भी मॉँ की याद आएगीतब तब मैं प्रेम की भावना बन जाऊंगा...’ या कवितेने दर्डा यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला. या वेळेस अतिरिक्त जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या पुष्पादीदी, अविनाश गोठी यांच्यासह व्याख्यानमालेचे उपाध्यक्ष विजय हाके, कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह, मधुकर झेंडे, अरुण शेंदुर्णीकर उपस्थित होते.