शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अन्याय ! गुणवत्ता असूनही विद्यार्थी वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 01:20 IST

राज्यातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया ७०:३० धोरणाप्रमाणे राबविली जाते. त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. तसेच याबाबत विधि मंडळ मान्यता प्रक्रियाही राबविण्यात आलेली नाही.

लातूर : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात विदर्भ आणि मराठवाड्यात मिळून २३०० तर उर्वरित महाराष्ट्रात ३८५० जागा असून, ७०:३० धोरणामुळे गुणवत्ता असूनही मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांना दर्जेदार महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत नाही. हे घटनाबाह्य प्रादेशिक आरक्षण रद्द करण्यासाठी दोन्ही विभागातील विद्यार्थी, पालक, संस्था एकवटल्या आहेत.राज्यातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया ७०:३० धोरणाप्रमाणे राबविली जाते. त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. तसेच याबाबत विधि मंडळ मान्यता प्रक्रियाही राबविण्यात आलेली नाही. १९८५ पासून ही अट प्रवेश पुस्तिकेत अंतर्भूत करण्यात आली. ज्यामध्ये स्वविद्यापीठ ७० टक्के आणि इतर विद्यापीठांसाठी ३० टक्के ही पद्धत होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर आता सर्व वैद्यकीय महाविद्यालये एकाच विद्यापीठाला संलग्नित आहेत. त्यामुळे ७०:३० आरक्षण पद्धत रद्द करणे आवश्यक होते. मात्र ती आजही सुरू आहे. घटनेतील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उभे आरक्षण केवळ जातीनुसार देता येते, त्यात आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा अपवाद करण्यात आला आहे.मात्र त्यात प्रादेशिक आरक्षण अंतर्भूत नसल्याने सध्याची प्रचलित प्रक्रिया घटनाबाह्य असल्याची भूमिका शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी मांडली आहे. या संदर्भात २०१६ मध्ये पालक संघाने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. विदर्भ, मराठवाड्याची एकूण उपलब्ध महाविद्यालयांची संख्या अनुक्रमे ८ व ६ आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात २६ महाविद्यालये आहेत. दंत वैद्यकमध्येही विदर्भ, मराठवाड्याची ५ व ७ तर उर्वरित महाराष्ट्रात १८ महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थी जागांमध्ये तफावत असून, मराठवाडा, विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यांना ३० टक्के जागांमध्येच स्पर्धा करावी लागते.गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धाप्रादेशिक आरक्षण अंतर्भूत नसल्याने सध्याची प्रचलित प्रक्रिया घटनाबाह्य असल्याची भूमिका शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी मांडली आहे. या संदर्भात २०१६ मध्ये पालक संघाने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. विदर्भ, मराठवाड्याची एकूण उपलब्ध महाविद्यालयांची संख्या अनुक्रमे ८ व ६ आहे.तर उर्वरित महाराष्ट्रात २६ महाविद्यालये आहेत. दंत वैद्यकमध्येही विदर्भ, मराठवाड्याची ५ व ७ तर उर्वरित महाराष्ट्रात १८ महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थी जागांमध्ये तफावत असून, मराठवाडा, विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यांना ३० टक्के जागांमध्येच स्पर्धा करावी लागते.वैद्यकीय महाविद्यालयसंख्या व विद्यार्थी जागा...विभाग महाविद्यालय विद्यार्थी जागाउर्वरित महाराष्ट्र २६ ३८५०विदर्भ ०८ १४५०मराठवाडा ०६ ८५०दंत वैद्यकीय महाविद्यालयव विद्यार्थी संख्या...विभाग महाविद्यालय विद्यार्थी जागाउर्वरित महाराष्ट्र १८ १५६०विदर्भ ०५ ४००मराठवाडा ०७ ६५०२०१९-२० मधील ७० टक्केप्रवेशाचा कट्आॅफ...संवर्ग उर्वरित महाराष्ट्र विदर्भ मराठवाडायु.आर. ५५१ ५२८ ५३३ओबीसी ५१६ ५२६ ५२८एससी ४२१ ४५१ ४५३एसटी २९० ३२३ ३२१व्हीजे ४६० ४६८ ४९४एनटी-१ ४०७ ४४६ ४८०एनटी-२ ४९२ ४६६ ५१२एनटी-३ ५१६ ५०८ ५३३एसईबीसी ५१३ ३९९ ५२७ईडब्ल्यूएस ४९२ ४८९ ५०८वरील तक्त्यानुसार राज्यातील दर्जेदार व गुणवत्ता असणाऱ्या मुंबई, पुणे, ठाणे व नागपूर येथील प्रवेशासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना ३० टक्के जागांमध्येच स्पर्धा करावी लागते. त्यांच्यापेक्षा कमी गुण असणाºया उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मात्र दर्जेदार महाविद्यालयात प्रवेश मिळतो.

टॅग्स :reservationआरक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र