शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील ज्येष्ठ नागरिकाने दिले दोघांना जीवनदान, अपघातानंतर झाला होता मेंदू मृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 18:53 IST

सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वसईच्या गोपालन (वय ७८) यांना सायकलच्या धडकेनंतर त्यांचा मेंदू मृत झाला होता . त्यांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला व गोपालन यांच्या मृत्यूनंतर यकृत व किडनी दानामुळे दोघा रुग्णांना जीवनदान मिळाले.

मीरारोड,  दि. 17 - सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वसईच्या गोपालन (वय ७८) यांना सायकलच्या धडकेनंतर त्यांचा मेंदू मृत झाला होता . त्यांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला व गोपालन यांच्या मृत्यूनंतर यकृत व किडनी दानामुळे दोघा रुग्णांना जीवनदान मिळाले.किडनीच्या व यकृताच्या विविध आजारांनी ग्रस्त लाखो रुग्ण देशात दरवर्षी दगावतात. त्या तुलनेत प्रत्यारोपणाची संख्या जेमतेम पाच टक्के म्हणजेच तीन ते साडेतीन हजार आहे. रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी १ लाख ६० हजार जण प्राण गमावतात. त्यापैकी ७० टक्के अपघाती रुग्ण ब्रेनडेड असतात. अशा रुग्णांच्या नातेवाइकांचे मन अवयवदानासाठी वळवण्यात आले तर किडनी प्रत्यारोपणाचा अनुशेष भरणे शक्य आहे.१२ सप्टेंबर रोजी गोपालन यांना सायकलच्या धडकेने अपघात झाल्याने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी मीरा रोडच्या खाजगी रुग्णालयात त्यांना आणले असता तपासणीनंतर डॉक्टरांनी गोपालन यांना ब्रेन डेड घोषित केले. कुटुंबीयांनी मोठ्या जाणीवेने १४ सप्टेंबरला ब्रेन डेड झालेल्या गोपालन यांचे अवयवदान करण्याचे ठरविले. १५ सप्टेंबर रोजी प्रादेशिक प्रत्यारोपण समन्व्य केंद्राच्या मार्गदर्शनाखाली व प्रतीक्षायादीप्रमाणे गरजू रुग्णास किडनी व यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.किडनी प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. राजेश कुमार म्हणाले, " ब्रेन डेडच्या रुग्णांमध्ये दोन्ही किडन्या दोन रुग्णांना देऊन त्यांचे प्राण वाचविता येतात परंतु गोपालन यांचे वय पाहता त्यांच्या दोन्ही किडन्या या एकाच व्यक्तीला देण्यात आल्या. मालाड येथे राहणाऱ्या ५० वर्षीय (पुरुष ) रुग्णाला या किडन्या प्रत्यारोपण करण्यात आल्या असून आता त्यांची प्रकृती उत्तम असून नैसर्गीकरीत्या लघवीची प्रकिया सुरु झाली आहे. गेली ३ वर्षे ते डायलासिसवर होते."तर गोपालन यांचे यकृत प्रत्यारोपण करणारे यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. अनुराग श्रीमल म्हणाले, " गोपालन यांच्या वयाचा विचार करता त्यांचे यकृत चांगले कार्यरत होते. यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुंबईतील एका ५६ वर्षीय ( पुरुष ) रुग्णावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले असून त्यांची प्रकृतीत सुधारत आहे."गोपालन यांच्या मुलाने व नातेवाईकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे. अवयवदानाच्या जनजागृतीमुळे आणखी जीव आपल्याला वाचविता येतील अशी आशा रवी हिरवाणी यांनी व्यक्त केली .

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल