शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अमानुष हत्याकांड

By admin | Updated: February 29, 2016 04:52 IST

साखरझोपेत असलेल्या आपल्याच कुटुंबातील एकूण १४ जणांची हसनैन वरेकर या माथेफिरू तरुणाने ‘कुर्बानी’ देण्याच्या चॉपरने रविवारी पहाटे हत्या केली.

ठाणे : साखरझोपेत असलेल्या आई, वडील, पत्नी, तीन बहिणींसह दोन मुली आणि बहिणींची मुले अशा आपल्याच कुटुंबातील एकूण १४ जणांची हसनैन वरेकर या माथेफिरू तरुणाने ‘कुर्बानी’ देण्याच्या चॉपरने रविवारी पहाटे हत्या केली. त्यानंतर, स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडवली गावात अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या क्रूर हत्याकांडाने ठाणे शहर हादरून गेले. हसनैन अन्वर वरेकर (३५) या माथेफिरूने हे हत्याकांड नेमके कोणत्या कारणासाठी केले, याचा तपास सुरू असल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली. मानसिक स्थिती बिघडल्याने किंवा कौटुंबिक कलहातून ही घटना घडली का? याचा पोलीस तपास करीत आहेत. हसनैनचा लॅपटॉप आणि मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.हत्याकांडातून त्याची बहीण सुबिया (२२, रा. म्हापोली, भिवंडी) सुदैवाने बचावली. तिने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले आणि आपला जीव वाचविला. तिचा आक्रोश ऐकून हसनैनचे मामा आणि चुलत्यांनी खिडकीचे ग्रील तोडून सुबियाची सुटका केली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या जबानीनंतरच या सर्व प्रकाराचा उलगडा होईल. घरातील चादरी, गाद्या आणि उशा रक्ताने अक्षरश: माखल्याने पोलिसांना मृतदेह गुंडाळण्यासाठी चादरींची शोधाशोध करावी लागली. घरातील सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर सर्वांत शेवटी हसनैनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.सीबीआयकडून चौकशी व्हावीवरेकर हत्याकांडाची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग किंवा केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी त्याची पत्नी जबीनचे चुलते व तळवली अर्जुलीचे माजी सरपंच सलीम नजे आणि इरफान पटेल यांनी केली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्याकांडानंतर ‘बघ्यां’ची गर्दी उसळल्याने दंगल नियंत्रण पथकाला बोलवावे लागले.सुबिया वाचली...सुबिया जागी होताच हसनैनने तिच्यावरही चॉपरचा वार केला. तिने तो कसाबसा चुकवला, तरीही तिच्या मानेला गंभीर जखम झाली आणि तिने पळ काढला. बेडरूमला तिने लागलीच कडी लावली आणि खिडकीच्या ग्रीलवर बसून बचावासाठी धावा करू लागल्याने, ती यातून बचावली.अन्नाचे नमुने घेतले : या कुटुंबीयांनी रात्री तंदुरी चिकन आणि सरबत घेतले होते. त्यासह रक्त, व्हिसेरा आदींचे नमुने घेण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच याबाबत बोलता येईल, असेही सहपोलीस आयुक्त डुंबरे यांनी सांगितले.चार वर्षांपूर्वीही विषप्रयोग ?एनर्जी ड्रिंक म्हणून कोणत्यातरी ‘भोंदू’ वैदूने दिलेल्या औषधामुळे ही विषबाधा झाली होती. यासंदर्भात १ जुलै २०१२ रोजी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून, तसा जबाब हसनैनच्या वडिलांनी दिला आहे.सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, चर्चांवर भाष्य करता येणार नाही. पण, त्यांनी घेतलेल्या औषधासह ज्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले, तेथील रेकॉर्ड गोळा करण्यात येणार आहे; तसेच या कुटुंबीयांविरोधात कोणती तक्रार आहे, याचाही शोध घेण्यात येत आहे.अशी आहेत मृतांची नावे : अन्वर इस्माईल वरेकर (५८, हसनैनचे वडील), अजगरी अन्वर वरेकर (५०, हसनैनची आई), पत्नी जबीन (२८), मुलगी मुब्बतशिरा (४), उमेरा (३ महिने), बहीण शबीना शौकत खान (३५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), बत्तुल अन्वर वरेकर (२८, अविवाहित बहीण), मारिया हरफन फकी (२८, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), अनस शौकत खान (१२, भाची, कोपरखैरणे), अलीहसन शौकत खान (५, भाचा, रा. कोपरखैरणे), युसूफ अरफान फकीर (४, भाचा, रा. कोपरखैरणे), अरसिया जोसेफ भरमल (५ महिने, जखमी बहिणीची मुलगी), उमेर अरफान फकी (५), सादीया शौकत खान (१६, भाची, रा. कोपरखैरणे)