शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षांच्या कत्तलींची माहिती आता वेबसाईटवर

By admin | Updated: March 31, 2017 01:48 IST

मुंबई एमएमआर क्षेत्रातील महत्त्वाच्या पाच महापालिकांकडून त्यांच्या क्षेत्रात किती वृक्ष कापण्याची परवानगी देण्यात आली,

मुंबई : मुंबई एमएमआर क्षेत्रातील महत्त्वाच्या पाच महापालिकांकडून त्यांच्या क्षेत्रात किती वृक्ष कापण्याची परवानगी देण्यात आली, किती वृक्ष कापण्यात आले आणि किती वृक्षांची लागवड झाली याची माहिती जिओ टॅगिंगसह आपल्या वेबसाइटवर अपलोड करावी लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिली.भांडुपमध्ये पिरामल रिअ‍ॅल्टी या विकसकाकडून अशोक, पिंपळ, जंगली चेरी, आंबा, खजूर, नारळ, कडूलिंब आदी वृक्षांची तोड करण्यात आली. त्यावरील हरकतींना बगल देऊन विकासकाला वाचविले जात असल्याबद्दल अशोक पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. रस्त्याच्या बांधकामाआड येणारे झाड तोडायचे तर आम्हाला वर्षवर्ष परवानगी मिळत नाही; पण बिल्डरांना ती पटापट दिली जाते. यात काही गैरव्यवहार होतात, असा आरोप त्यांनी केला. या विकासकावर कारवाईची मागणी त्यांनी केली. या प्रकरणी चौकशीअंती कारवाईचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. ठाणे शहरातही अशाच प्रकारे हजारो पुरातन वृक्षांची कत्तल करण्यात आली. हे विकासक आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीतून हे घडत असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी केला. मेट्रोसाठी झाडे कापण्यावरून आगडोंब उसळतो आहे. पर्यायी वृक्षलागवड त्यात केली जाणार आहे पण अशी कोणतीही पर्यायी लागवड न करता विकासकांना परवानग्या कशा काय दिल्या जातात, असा प्रश्न भाजपाचे आशिष शेलार यांनी केला. (विशेष प्रतिनिधी) २०१०पासून तोडले २५ हजार वृक्षमुंबईत २०१० ते २०१६ दरम्यान तब्बल २५ हजार वृक्ष तोडण्याची परवानगी वृक्ष प्राधिकरणाने दिल्याची माहिती आज सभागृहात देण्यात आली.