शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विद्यापीठांच्या दौऱ्यावर, फेसबुक लाइव्हद्वारे दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 02:39 IST

सोमवारी ते गडचिरोली, नागपूर, अमरावती विद्यापीठांचा दौरा करतील. यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा देणा-या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक मानसिकता तयार करणे आणि सोप्या पद्धतीने परीक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई : अंतिम वर्ष परीक्षांची राज्यातील प्रत्येक विद्यापीठाची तयारी सुरू असताना प्रत्येक विद्यापीठाची काय तयारी आहे? समस्या काय आहेत याचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत सोमवारपासून राज्यातील विद्यापीठांचे दौरे करणार असल्याची माहिती त्यांनी रविवारी फेसबुक लाइव्हद्वारे दिली.सोमवारी ते गडचिरोली, नागपूर, अमरावती विद्यापीठांचा दौरा करतील. यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा देणा-या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक मानसिकता तयार करणे आणि सोप्या पद्धतीने परीक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, मार्गदर्शक सूचना जारी करून, विद्यापीठांच्या अकॅडमिक कौन्सिलच्या निर्णयानुसार योग्य त्या पद्धतीने आॅनलाइन / आॅफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठांना देण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील ७ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण परीक्षा देताना येणार नाही याची काळजी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घ्यायची असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद अशा बहुतांश विद्यापीठांकडून परीक्षा आॅनलाइन एमसीक्यू (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी उत्तरे) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. एसएनडीटी विद्यापीठाचे ९०% प्रात्यक्षिक पूर्ण झाले असून २५ एमसीक्यूच्या परीक्षांची तयारी असल्याची माहितीही त्यांनी दिली. या सर्व परीक्षांआधी विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्ट घेतल्या जाणार असून लवकरच त्यांना प्रश्नपेढ्या पुरविल्या जातील असेही त्यांनी सांगितले. असाइनमेंट पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्यायही अनेक विद्यार्र्थ्यांनी मागितला. मात्र प्रश्नपत्रिका छापणे, त्या वितरित करणे, त्यांचे संकलन, मूल्यमापन या सर्व प्रक्रियेत कोरोना संसर्गाचा धोका असल्याने अनेक विद्यापीठांनी आॅनलाइन एमसीक्यू पद्धतीचा पर्याय निवडल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत