शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

माहिती आयुक्त गायकवाड यांना औरंगाबादमध्ये बेदम मारहाण

By admin | Updated: April 18, 2017 05:27 IST

मुंबईतील दादर येथील आंबेडकर भवनाची वास्तू पाडल्याच्या रागातून राज्याचे माहिती आयुक्त तथा माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड

विकास राऊत , औरंगाबादमुंबईतील दादर येथील आंबेडकर भवनाची वास्तू पाडल्याच्या रागातून राज्याचे माहिती आयुक्त तथा माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड व त्यांच्या पत्नी शिवगंगा यांना भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास येथील सुभेदारी विश्रामगृहावर घडली.गायकवाड हे शासकीय दौऱ्यावर सपत्निक औरंगाबादेत सोमवारी सकाळी आले होते. ‘सुभेदारी’वर त्यांचा मुक्काम होता. सामान ठेऊन ते कोकणवाडीतील माहिती कार्यालयाची पाहणी करण्यासाठी गेले. दुपारी तीनच्या सुमारास ते परतले असता, भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. महिला कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या पत्नीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. गायकवाड यांनी कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुभेदारीत दडून बसलेल्या इतर कार्यकत्यांनी चोहोबाजूंनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी सुरक्षाकवच देईपर्यंत भारिपचे कार्यकर्ते गायकवाड दाम्पत्यास मारहाण करत होते. पोलिसांनी गायकवाड दाम्पत्याची सुटका करून विमानतळावर सुखरूप पोहोचविले. गायकवाड यांनी मुंबई विमानतळ पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून, ती औरंगाबादेत वर्ग करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले. या घटनेत दोन पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले आहेत. गायकवाड यांच्यावर राग होताच : डोळसमुंबईतील आंबेडकर भवन प्रकरणात रत्नाकर गायकवाड यांनी आंबेडकरी चळवळीची, आंबेडकरी कुटुंबीयांची हेटाळणी केली, त्यामुळे आंबेडकरी समाजात त्यांच्याबद्दल प्रचंड राग होता. तो कुठे ना कुठे व्यक्त होणारच होता. तो आज औरंगाबादेत झाला, अशी प्रतिक्रिया भारिप-बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते प्रा. अविनाश डोळस यांनी व्यक्त केली. ते स्वत:च कारणीभूत ?रत्नाकर गायकवाड यांच्याबाबतीत आज जो प्रसंग उद्भवला, त्यास ते स्वत:च कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया भारिप-बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड बी. एच. गायकवाड यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आंबेडकर भवन हे प्रेरणास्थान आहे. तेथे बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांची कार्यालये होती. ती तोडून टाकणे हे योग्य नव्हते. ही कार्यालये उद्ध्वस्त करण्याचे काम गायकवाड यांनी केले नसते, तर आजचा प्रसंग उद्भवला नसता. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अमित भुईगळ आणि इतर कार्यकर्त्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा (कलम ३०७) गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय दंगलीचा (कलम १४७, १४८, १४९) तसेच सरकारी कामात अडथळा आणून दहशत निर्माण करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ, दिनेश साळवे, श्रीरंग ससाणे, गौतम गवळी, शांताबाई धुळे, रेखा उजगरे, संदीप वाघमारे, प्रदीप इंगळे यांनी हल्ला केला. या सर्वांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.