शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचं दुष्टचक्र!, डिझेलने तोंडचं पाणी पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:37 IST

इंधनाचा उडालेला भडका आणि मजुरीच्या वाढलेल्या दरांमुळे बळीराजापुढे महागाईचे दुष्टचक्र उभे राहिले आहे.

- योगेश बिडवई मुंबई : इंधनाचा उडालेला भडका आणि मजुरीच्या वाढलेल्या दरांमुळे बळीराजापुढे महागाईचे दुष्टचक्र उभे राहिले आहे. चार वर्षांत लीटरमागे ५७ रुपये असलेला डिझेलचा भाव आता ७१ रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे साहजिकच ट्रॅक्टरने नांगरणी करण्यापासून वाहतुकीपर्यंतचा खर्च सुमारे २० टक्क्यांनी वाढला आहे. राज्यात १० वर्षांत मशागतीचा खर्च तर जवळपास तीनपटीने वाढलाआहे. कोरडवाहू शेतकऱ्यांचे जीवनच पावसावर अवलंबून असते. शेतीचा खर्च वाढल्याने अल्पभूधारक शेतकºयांचे कुटुंब स्वत:च खरिपाची मशागत करतात. त्यांना मजूर परवडत नाही. चार महिने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व कुटुंब शेतात राबते, तेव्हा कुठे पीक तरारते. मराठवाड्यात एकरमागे नांगरणी २००, वखर १००, पेरणी १०० रुपयांनी वाढली आहे.>एकरी खर्च/रुपयेविभाग विदर्भ मराठवाडा प.महाराष्ट्र/खान्देशनांगरणी १७०० १६०० १६००वखर ६५० ६०० ७००पेरणी ७५० ७०० ७००विदर्भात अडवणूकमजुरांच्या टंचाईमुळे विदर्भात शेतकºयांची अडवणूक होते. परिणामी, मजुरीचा खर्च वाढतो. ट्रॅक्टरचा खर्चही अधिक आहे.रोटावेटरचा खर्च वाढलाकांदे, हळद, ऊस, आले, बटाटे आदी पिकांसाठी रोटावेटर वापरले जाते. त्याचा खर्च ७०० वरून ८०० ते ८५० रुपयांवर गेला आहे.>विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रात नांगरणीचा एकरी खर्च साधारणपणे 300 रुपयांनी वाढला आहे. रासायनिक खतांच्या किमतीतही ५० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. युरियाची बॅग ५० किलोवरून ४५ रुपये किलोची झाली आहे.