शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

महागाईने फळांचा गोडवा घटला

By admin | Updated: August 8, 2015 01:21 IST

सध्या कोकिळा व्रतासह इतरही धार्मिक उपवासाचे दिवस सुरू असून फळांना चांगली मागणी असल्याने त्यांना चांगला भावही मिळत आहे़ परदेशातून येणारे सफरचंद व द्राक्षे

राम जाधव, जळगावसध्या कोकिळा व्रतासह इतरही धार्मिक उपवासाचे दिवस सुरू असून फळांना चांगली मागणी असल्याने त्यांना चांगला भावही मिळत आहे़ परदेशातून येणारे सफरचंद व द्राक्षे तर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत़या वर्षीच्या पाऊसमानाचा फळउत्पादनालाही फटका बसला आहे़ तसेच १८ वर्षांनंतर या वर्षी आलेल्या कोकिळाव्रताच्या उपवासासाठी महिला वर्गातून मोठ्या प्रमाणावर फळांची मागणी आहे़ त्यामुळे सध्या बाजारपेठेत सर्वच फळांचे भाव वाढलेले आहेत़ जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातून डाळिंब, पपई व मोसंबीची आवक होत आहे़ पपईची आवक घटल्याने भाव वाढले. द्राक्षे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरपरदेशातून येणाऱ्या वॉशिंग्टनच्या द्राक्षांना ३२० रुपये प्रती किलो भाव मिळत आहे़ लालसर व मध्ये बी असलेले हे द्राक्ष चवीलाही गोड असल्याने चांगलाच भाव खात आहेत़ त्यामुळे सध्यातरी हे द्राक्ष सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत़ स्थानिक द्राक्षे बाजारपेठेत यायला अजून अवधी असून साधारण डिसेंबर महिन्यात ती बाजारात येण्याची शक्यता आहे़ डाळिंबांची आवक चांगली ....मागील वर्षी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे डाळिंबाचा हंगाम लांबणीवर पडत गेला़ त्यामुळे बहुतेक ठिकाणचा माल आता तयार झाल्याने बाजारपेठेतील आवक एकदमच वाढली आहे़ परिणामी डाळिंबाचे भाव मर्यादित असल्याने ग्राहकांसाठी तेवढाच एक दिलासा आहे़ सध्या डाळिंबाला किरकोळ बाजारात ६० ते १२० रुपये असा प्रतीनुसार भाव मिळत आहे़