डोंबिवली : अनेक गंभीर गुन्ह्यांप्रकरणी जिल्ह्यातून तडीपार केलेला कुख्यात गुंड मौलाली ऊर्फजाकीर ऊर्फ आप्या शेख (२६) याला डोंबिवली पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. ही कारवाई कोपर रेल्वे स्थानकासमोर रात्री करण्यात आली.कोपर स्थानकासमोरील सहकारनगर झोपडपट्टीत राहणारा शेख हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत अवघडे यांच्या नेतृत्वाखाली सचिन वानखेडे, संतोष जाधव, सागर शिंगटे, चंद्रकांत शिंदे व पायलट श्रीराम मिसाळ यांनी त्याला झोपडपट्टीतील एका गल्लीतून अटक केली. त्याच्याविरोधात दंगल, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या आदी गंभीर गुन्ह्यांच्या विविध पोलीस ठाण्यांत नोंदी आहेत. (प्रतिनिधी)
कुख्यात गुंड आप्या शेखला अटक
By admin | Updated: July 21, 2016 02:34 IST