शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

असमानतेलाच फेकावे लागेल

By admin | Updated: November 25, 2015 03:05 IST

स्त्री सक्षमीकरण करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. मात्र, त्याचा वेग आपल्याला हवा तसा नाहीये. मुळात आपण एकाच वेळी वेगवेगळ्या शतकांत जगत आहोत

पुणे : स्त्री सक्षमीकरण करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. मात्र, त्याचा वेग आपल्याला हवा तसा नाहीये. मुळात आपण एकाच वेळी वेगवेगळ्या शतकांत जगत आहोत. एकाच वेळी बदलते चित्र दिसत आहे, तर त्याच वेळी बंधनात अडकलेली स्त्री दिसत आहे. त्यामुळे बदलाची प्रक्रिया ही चिरंतन आहे आणि शाश्वत बदलांसाठी खूप काळ जावा लागेल. पण हार न मानता किमान आपल्या विचारांत, जाणिवांत रुतून बसलेल्या असमानतेला काढून फेकण्याची गरज आहे, अन् तिथूनच सुरुवात करण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांनी व्यक्त केले.‘कलर्स प्रस्तुत एनईसीसीच्या सहकार्याने आयोजित लोकमत वूमन समिट ’ मध्ये त् आझमी यांनी उपस्थितांशी संवाद साधत निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकला. ‘स्त्री सशक्तीकरण, स्त्री सुरक्षा किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यासाठी प्रत्येक वेळी सर्वांनीच प्रत्यक्ष लढ्यात उतरण्याची गरज नसते. तसे अपेक्षितही नसते. मात्र, जे लोक समर्पित होऊन असे मुद्दे उचलून धरतात, झोकून देऊन काम करतात, त्याला पूर्ण समाजाने पाठिंबा देण्याची अत्यंत गरज आहे. त्या पाठिंब्यानेही प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना उभारी येते आणि आपला पाठिंबा असणे ही आपल्या बदलत्या जाणिवांचे द्योतक असते, असे सांगत आझमी यांनी बदलाच्या मंद वेगाविषयी आपल्या वडिलांनी सांगितलेला एक मंत्रही सांगितला. आझमी म्हणाल्या, ‘‘बदलाची प्रक्रिया ही किचकट असते. त्याचा वेग आपल्याला अपेक्षित असेल त्या पद्धतीने नसेलही; किंबहुना ते बदल आपण जिवंत असताना आपल्याला अनुभवता येणारही नाहीत. मात्र, आपण जर प्रामाणिकपणे एखाद्या गोष्टीसाठी झटत असू, तर एक ना एक दिवस ते बदल घडतातच. त्यामुळे निराश न होता, आपण झटत राहायलाच हवे.लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन खासदार विजय दर्डा, संपादक विजय बाविस्कर, प्रेसीडेंट (अ‍ॅडव्हर्टायजींग अ‍ॅँड सेल्स) करुण गेरा, असिस्टंट व्हाईस प्रेसीडेंट अजित नायर, वंसत आवारे, महाव्यवस्थापक मिलन दर्डा, उपमहाव्यवस्थापक आलोक श्रीवास्तव या वेळी उपस्थित होते. महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा ुमुंडे, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांनी महिलांच्या विविध प्रश्नांवर आणि यशोगाथांवरही केलेल्या चर्चेतून कलर्स प्रस्तुत एनईसीसीच्या सहकार्याने आयोजित ‘लोकमत वुमेन समिट’ रंगली.अजमेरा हाऊसिंग कॉर्पोरेशन, सिंहगड इन्स्टिट्यूट, मुछाल सारीज, सुरेखा आऊटडोअर हे सहयोगी प्रायोजक होते आयबीएन - लोकमत या उपक्रमाचे टेलीव्हिजन पार्टनर होते. नवे समृध्द आणि संपन्न अनुभवविश्व घेऊन सर्वजण समाधानाने बाहेर पडले.बदल म्हणजे लिटमस टेस्ट नव्हेस्त्री सक्षमीकरणासाठी स्त्रियांनी बदलणे किंवा स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी पुरुषांनी बदलणे ही काही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. बदल म्हणजे लिटमस टेस्ट नव्हे की टेस्ट केले की ‘रिझल्ट ’ मिळायला. शाश्वत बदलांसाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. मानसिकतेत आपल्या जाणिवांत बदल आणण्याची गरज आहे. शाश्वत बदलांसाठी वर्षानुवर्षांचा झगडा द्यावाच लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे आता काही प्रमाणात बदल दिसतच आहेत. त्यात अधिक भर घालण्याची गरज असल्याची आशा शबाना आझमी यांनी व्यक्त केली.- आयुष्यात आलेल्या संकटाकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. मोठ्या आव्हानांचा पाठलाग करण्याची संधी मिळणे यासारखे भाग्य नाही. जगात कोणतीही गोष्ट अवघड असेल; पण अशक्य नाही.- आजही स्त्रीबाबत साचेबद्ध विचार केला जातो. असे का? हे चित्र बदलले पाहिजे आणि यासाठी स्त्रियांनीच पुढे यायला हवे.- तरुणींच्या स्वप्नांना हक्क मिळवून देणारे व्यासपीठ तयार व्हायलाच हवे. स्वत:चा आणि कुटुंबाचा खंबीर पाठिंबा हवा. कारण, बदलांची सुरुवात स्वत:पासून होते.-आत्मसन्मान महत्त्वाचा. तो असेल तर इतरांच्या खोट्या आधाराची, आदराची काय गरज?-आपण कोणा एकाही तरुणीची मदत करू शकलो तरी आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.-आई-वडिलांच्या अतिकाळजीमुळे मुली मागे पडतात. त्यामुळे पालकांनी केवळ आधार देत तिला आसमंतात भरारी घेऊ द्यायला हवी; तरच तिचे क्षितिज विस्तारू शकेल.-समाजामध्ये ठामपणे एखादी गोष्ट मांडल्याशिवाय ती सिद्ध करता येत नाही.-मुलांना बालपणापासून समानतेची शिकवण दिली गेली पाहिजे. त्याच विचारांतून त्यांचे संगोपन व्हावे.-प्रत्येकाला संघर्षाचा सामना करावाच लागतो. त्या वादळातून तावून-सुलाखून बाहेर पडणारा तोच खरा फायटर.‘फेमिनिस्ट’ व्हावेच लागेलस्त्री-पुरूष समानतेवर चर्चा घडत असल्या तरी ग्रामीण भागात अजूनही महिलांची परिस्थिती सुधारलेली नाही. हेल्पलाईन सुरू केल्यावर समजले महिलांचे प्रश्न हे लैैंगिक नव्हे तर सक्षमीकरणावरचे होते. मला काहीतरी करायचे असेल तर आता मलाच स्वत:चा विचार करायला पाहिजे. सगळ्यांना यासाठी आता ‘फेमिनिस्ट’ व्हावे लागेल. मात्र फिजिकल स्टे्रंंथपेक्षा नवनिर्मिती होणे महत्त्वाचे आहे, जे काम महिलाच अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात. - डॉ. रुची दाससंधी ओळखायला शिकामहिलांनी कोणतीही गोष्ट हातात घेतली, की स्वत:ला पूर्णपणे झोकून देतात. व्यावहारिकतेपेक्षा भावनिक गुंतवणूक म्हणून कामाकडे पाहतात. त्यामुळेच ‘गुणवत्ता’ हा स्त्री-पुरुषांच्या कामामधला एक प्रमुख निकष ठरतो. मुळात आजच्या स्थितीचा विचार केला तर महिलांना खूप संधी आहेत. पाच वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. सध्याच्या इंटरनेटच्या युगात ‘डिजिटल मीडियाने’ मोठ्या प्रमाणावर क्रांती घडविल्याने महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. - शैली चोप्रामहिला बचतगटांना रोजगार‘डोन्ट वेस्ट वेस्ट’... असे स्लोगन असलेली घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणारी आमची कंपनी. एक सामाजिक काम म्हणून त्याच्याकडे मी पहाते. कचऱ्यामधून वीज आणि गॅसनिर्मितीचे अनेक प्रयोग आम्ही यशस्वी केले आहेत. ज्यातून अनेक रोजगारही उपलब्ध झाले आहेत. घरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे गॅसमध्ये सहजपणे आपण रूपांतर करू शकतो. महिला बचत गटांना हे काम दिल्यास रोजगारही निर्माण होऊ शकतो. - निर्मला कंदलगावकरकुटुंबापासूनच समानतेची बीजे रुजावीतपुणे : महिलांमध्ये खूप क्षमता असते. अस्वत:चे आरोग्य, आवडी-निवडी सांभाळून आपल्याला पुढे जायचे आहे, याची जाणीव असायला हवी. महिलांनी एकमेकींचा सन्मान करीत पुढे जायला हवे, असा सूर े ‘ब्रिजिंग दि गॅप-व्हॉट वूमन अ‍ॅट दि टॉप आॅफ दि सोशो इकॉनॉमिक लॅडर कॅन डू फॉर दि वूमन अ‍ॅट दि बॉटम आॅफ इट?’ या विषयावरील परिसंवादात उमटला. कामानी ट्यूब्जच्या अध्यक्षा कल्पना सरोज, देशातील पहिल्या एमबीए सरपंच छवी राजावत, पॉलरायटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेसी पॉल व प्रशांती कॅन्सर केअर मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लाले बुशेरी या सहभागी झाल्या होत्या.बाराव्या वर्षीच लग्न झाले. पण मला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे हे घर सोडून स्वत:च्या पायांवर उभे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महिलांसाठी छोटे-छोटे व्यवसाय उभे केले. संस्था स्थापन करून शासनाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेतले. महिलांना व्यवसाय मिळवून दिला.- कल्पना सरोज महिलांनीच महिलांचा सन्मान करायला शिकले पाहिजेपुणे : समाजामध्ये महिलांना सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी प्रथम महिलांनीच महिलांचा सन्मान करायला शिकले पाहिजे. आजही अनेक क्षेत्रात एखाद्या पुढे जाणाऱ्या महिलेला दुसरी महिलाच खाली खेचण्याचा प्रयत्न करते. याची सुरुवात घरापासून मुलगा-मुलगी भेद न करता आईनेच केली पाहिजे, असे मत राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केले.लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन खासदार विजय दर्डा, युएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे सहभागी झाल्या होत्या. यशस्विनींच्या यशाच्या लेखाजोखा हा चर्चेचा विषय होता.