शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘उद्योग’ची श्वेतपत्रिका १५ ते २० दिवसांत; उद्योगमंत्र्यांची नवी डेडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 07:02 IST

 पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, की राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याची चर्चा मागील अनेक दिवस राज्यात सुरू आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेद्वारे मांडली जाईल. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या उद्योग विभागाची श्वेतपत्रिका अधिवेशनाच्या शेवटच्या   आठवड्यापर्यंत काढली जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधानसभेत केली. यापूर्वी १ नोव्हेंबर २०२२ रोजी उद्योगमंत्र्यांनी एका महिन्यात श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर केले होते. मात्र चार महिने उलटूनही श्वेतपत्रिका आली नाही. आता उद्योगमंत्र्यांनी यासाठी नवी डेडलाईन दिली आहे.

 पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, की राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याची चर्चा मागील अनेक दिवस राज्यात सुरू आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेद्वारे मांडली जाईल. 

 वेदांत-फॉक्सकॉन, एअरबस आणि बल्क ड्रग पार्क, हे तीनही प्रकल्प शिंदे-फडणवीस यांच्या कालावधीत बाहेर गेलेले नाहीत. वेदांत-फॉक्सकॉनच्या  प्रकल्पाला त्यावेळच्या सरकारने इको सेन्सेटिव्ह झोनमधील जागा दाखवली. या जागेसंदर्भातील उच्चाधिकार समितीही नियुक्ती केली नाही. आमचे सरकार आल्यावर १५ जुलैला उच्चाधिकार समितीची बैठक झाली. मात्र आठ महिन्यात एक इंच जागा प्रकल्पाला महाराष्ट्रात मिळत नसेल तर तो प्रकल्प कसा करायचा, असे कंपनीने विचारले, त्यामुळेच हा प्रकल्प गेल्याचा दावा सामंत यांनी केला.

मविआ सरकारमुळेच प्रकल्प बाहेर nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला. केंद्राकडे हा प्रकल्प आम्हाला पाहिजे, असे त्यावेळच्या सरकारने लिहिलेले नाही, असे सांगत याचे खापरही सामंत यांनी मविआच्या सरकारवर फोडले.nबल्क ड्रग पार्क हा प्रकल्प केंद्राने महाराष्ट्राला दिला नाही. तरी या सरकारने रायगडमध्ये हा प्रकल्प करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्यासाठी जेवढे पैसे लागतील ते एमआयडीसीमार्फत दिले जातील, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत