शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

औद्योगिक क्षेत्रास मुद्रांक शुल्क माफ! किमान क्षेत्रफळात वाढ, सवलतींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 02:04 IST

उद्योग आणि निवासी क्षेत्राचा समावेश असलेल्या एकात्मिक औद्योगिक क्षेत्राची उभारणी करण्यासाठी यापुढे ४० हेक्टरऐवजी २० हेक्टर जागेवरच करता येणार आहे. या शिवाय, या क्षेत्रासाठी किमान क्षेत्रफळ, प्रवेश रस्ता, मुद्रांक शुल्क, वीज खरेदी आणि चटई क्षेत्र निर्देशांकामध्ये सवलती मिळणार आहेत.

मुंबई : उद्योग आणि निवासी क्षेत्राचा समावेश असलेल्या एकात्मिक औद्योगिक क्षेत्राची उभारणी करण्यासाठी यापुढे ४० हेक्टरऐवजी २० हेक्टर जागेवरच करता येणार आहे. या शिवाय, या क्षेत्रासाठी किमान क्षेत्रफळ, प्रवेश रस्ता, मुद्रांक शुल्क, वीज खरेदी आणि चटई क्षेत्र निर्देशांकामध्ये सवलती मिळणार आहेत.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबतचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील उद्योग शेजारच्या राज्यांमध्ये स्थलांतरित होऊ नयेत म्हणून या सवलती देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. आता किमान १२ मीटरपर्यंत रुंदीचा प्रवेश रस्ता असल्यासही एकात्मिक औद्योगिक क्षेत्रास मान्यता मिळणार आहे. यापूर्वी किमान २४ मीटर रस्त्याची अट होती. एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामध्ये ६० टक्के (औद्योगिक वापर) व ४० टक्के (व्यापारी व निवासी वापरासह आधारभूत सुविधा) अशी विभागणी असून यामध्ये ज्या बाबींच्या वापराचा समावेश नाही, अशा बाबींचा ६० टक्क्यांमध्ये समावेश करण्यात येईल. विकासक ते प्रथम खरेदीदार यांच्यातील प्रथम व्यवहारास विशेष नगर वसाहत प्रकल्पाच्या धर्तीवर ५० टक्क्याांर्यंत मुद्रांक शुल्क माफी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एकात्मिक औद्योगिक क्षेत्रासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रेडीरेकनर दराच्या एक टक्के विकास शुल्क आकारण्यात येते.टाऊनशिपसाठी सवलतीग्रामीण क्षेत्रामध्ये तसेच शहरी क्षेत्रामध्ये विशेष नगर वसाहतीसाठी (टाऊनशिप) मालमत्ता करामध्ये सवलत, ग्रामीण क्षेत्रामध्ये तसेच शहरी क्षेत्रामध्ये विशेष नगर वसाहतीसाठी खरेदी करावयाच्या जमिनीसाठी मुद्रांक शुल्कामध्ये सवलत यासह विविध सवलती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.मात्र, नगरविकास विभागाने विशेष नगर वसाहत प्रकल्पांसाठी असलेल्या मुद्रांक शुल्क माफी आणि विकास शुल्कामध्ये सुधारणा केल्यास त्या एकात्मिक औद्योगिक क्षेत्रासही लागू राहतील.आता एकात्मिक औद्योगिक क्षेत्रातील सर्व उद्योग घटकांची अथवा काही उद्योग घटकांची विजेची गरज एक मेगावॅटपेक्षा जास्त असल्यास त्याठिकाणी विकासक स्वत:च्या खर्चाने सबस्टेशन उभारून मुक्त प्रवेशाद्वारे अन्य वीज पुरवठादारांकडून वीज खरेदी करू शकेल.या क्षेत्रातील उद्योग घटकांना वीजपुरवठा करण्याची मुभा त्यास देण्यात आली आहे. स्वत:ची वीजनिर्मितीही करता येईल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र