शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण त्यांच्या पाठीशी- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 13:14 IST

भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांनीही आता इंदुरीकरांच्या महाराजांच्या विधानावरून सावध प्रतिक्रिया दिली आहे.  

मुंबईः कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मत व्यक्त करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत. त्यानंतर भाजपानं त्यांची बाजू उचलून धरण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांनीही आता इंदुरीकरांच्या महाराजांच्या विधानावरून सावध प्रतिक्रिया दिली आहे.  इंदुरीकर महाराजांची दिवसाला 80 प्रवचनं होतात. ती सगळी जनप्रबोधनाची असतात. प्रवचनातून ते शिक्षकांचं आणि पाण्याचं महत्त्व मांडतात. पण त्यांनी महिलांबद्दल असं म्हणायला नको होतं.

 एक वाक्यानं सगळं माणसांचं गेलं, असं होत नाही. मीसुद्धा इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाला जातो. एकदा पाच मिनिटं बसायच्या उद्देशानं गेलो होतो, मी तासभर थांबलो. इतकं मार्मिकपणे ते समाजातल्या चुकांवर बोट ठेवत आहेत. एका चुकीमुळे त्यांचं सगळं गेलं. एका वाक्यामुळे व्यक्ती खराब होत नाही. इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण त्यांच्या पाठीशी असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. 

इंदुरीकर महाराजांनी ते वक्तव्य करायला नको होतं. एका वाक्यानं माणसाची तपश्चर्या घालवू नका, त्याची राख करू नका, असंही चंद्रकांत पाटील माध्यमांना उद्देशून म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते वारंवार खोटे बोलतात. आम्ही हे सरकार पाडणार नसून हे सरकार स्वतःहूनच पडले, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. कायद्याचा धाक राहण्यासाठी फडणवीसांनी खूप कष्ट घेतले होते. आता कायद्याचा धाक राहिला नसल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे. दरम्यान, मनस्ताप सहन कराव्या लागल्या इंदुरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्यांना इशारा दिला. त्यामुळे इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ अपलोड करणाऱ्या अनेकांनी स्वत:हून व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात केली आहे.इंदुरीकर महाराजांचे हजारो व्हिडीओ यूट्यूबवर आहेत. त्यांना मिळालेले व्ह्यूज लाखोंच्या घरात आहेत. इंदुरीकर महाराज कीर्तनासाठी महाराष्ट्रभर प्रवास करतात. अनेक जण त्यांच्या कीर्तनाचं चित्रिकरण करतात. त्यानंतर ते स्वत:च्या यूट्यूबवर अपलोड करुन लाखो रुपये कमावतात. व्हायरल झालेल्या याच व्हिडीओंमुळे इंदुरीकर महाराज अडचणीत आले आहेत. त्यामुळेच त्यांनी यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्यांना थेट इशारा दिला. याचा धसरा घेऊन यूट्यूब अनेक चॅनेल चालवणाऱ्या अनेकांनी इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात केली. कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मतं मांडणारे इंदुरीकर महाराज मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलindurikar maharajइंदुरीकर महाराज