शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

आवाजाचे नमुने देण्यास इंद्राणीचा नकार

By admin | Updated: November 1, 2015 01:12 IST

बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने सीबीआयला आवाजाचे नमुने देण्यास शनिवारी नकार दिला. तब्येत ठिक नसल्याने ती नमुने देण्यास असमर्थ आहे

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने सीबीआयला आवाजाचे नमुने देण्यास शनिवारी नकार दिला. तब्येत ठिक नसल्याने ती नमुने देण्यास असमर्थ आहे, असे तिच्या वकिलांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर दंडाधिकाऱ्यांनी तिच्या आवाजाचे नमुने घेण्यापूर्वी तिचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.दरम्यान, इंद्राणीसह तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. सीबीआयला चौकशीची परवानगी दिल्यानंतर पहिल्यांदाच या तिघांना दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. यावेळी आतापर्यंत इंद्राणीची दोनदा चौकशी करण्यात आल्याचे सीबीआयने दंडाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, अद्याप तपास पूर्ण न झाल्याने तिघांकडे पुन्हा चौकशी करण्याची आवश्यकता भासू शकते, असेही सांगितले. इंद्राणीच्या आवाजाचे नमुने अद्याप घ्यायचे असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणले असता, तिच्या वकिलांनी इंद्राणी सीबीआयला मदत करत आहे, परंतु सध्या तिची मानसिक आणि शारीरिक स्थिती ठीक नसल्याने ती आता आवाजाचे नमुने देऊ इच्छित नाही, असे दंडाधिकाऱ्यांंना सांगितले. त्यावर दंडाधिकाऱ्यांनी इंद्राणीला आवाजाचे नमुने देणार का, अशी विचारले असता, तिने ‘नाही सर’ असे दंडाधिकाऱ्यांना सांगितले. तिची प्रकृती ठीक नसताना तिची चौकशी करण्यात येऊ नये, असे तिच्या वकिलांनी म्हटल्यावर दंडाधिकाऱ्यांनी तिची चौकशी करण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल घेऊन या, असे सांगितले. चौकशीसाठी दिलेली १२ दिवसांची मुदत संपल्याने तिघांनाही दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. (प्रतिनिधी)