शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Video : इंदुरीकर महाराजांच्या 'त्या' कीर्तनावरून गोंधळ; व्हिडीओ व्हायरल, चौकशीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:01 IST

याप्रकरणी अहमदनगरमधील पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने बैठकीत घेऊन

मुंबई - सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक आणि टिकटॉकवरुन हा व्हिडीओ व्हायरल होत असून गर्भलिंग निदान निवडीसंदर्भातील महाराजांच्या किर्तनातील वक्तव्याला आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे, पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांची चौकशी करण्यात येणार आहे.   

‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या यूट्यूब चॅनेलद्वारे इंदुरीकर महाराजांचे किर्तन सोशल मीडियात प्रसिद्ध केले जातात. या व्हिडीओवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, ‘सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’, असे महाराज म्हटले आहेत. तसेच, स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी मुलं होतात. टायमिंग हुकला का क्वालिटी खराब... असे विधान इंदुरीकर यांनी 4 जानेवारी रोजी यूट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये केले आहे. तसेच, पुराणकाळातील एक दाखलाही महाराजांनी यावेळी दिला होता. 

याप्रकरणी अहमदनगरमधील पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने बैठकीत घेऊन गर्भलिंगनिदान जाहीरात किंवा प्रचार केल्याबाबत महाराजांची चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे. पीसीपीएनडीटी कायदा कलम 22 अंतर्गत गर्भलिंग निदान निवडीबाबत जाहिरातीस बंदी आहे. छापील पत्रक, संवाद अगर एसएमस, फोन, इंटरनेटद्वारे गर्भलिंग निदान आणि निवडीची जहिरात करण्यास बंदी आहे. कलम 22(3), कलम 22 चा भंग झाल्यास संबंधितास तीन वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरViral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरलTik Tok Appटिक-टॉकFacebookफेसबुक