विश्वगुरू होण्याकडे भारताची वाटचाल - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 03:42 AM2019-09-23T03:42:29+5:302019-09-23T03:42:32+5:30

देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्वगुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले

India's Way to Become World Grand - Governor | विश्वगुरू होण्याकडे भारताची वाटचाल - राज्यपाल

विश्वगुरू होण्याकडे भारताची वाटचाल - राज्यपाल

Next

मुंबई : बल, बुद्धी आणि विद्येच्या आधारे भारत निरंतरपणे विकास करत आहे. भारतात पूर्वीपासून विश्वगुरू कार्यरत होते. देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्वगुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी येथे केले.

भारत जैन महामंडळाने बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित केलेल्या ‘विश्व मैत्री दिवस : क्षमापन’ समारोहात ते बोलत होते. या वेळी आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम.के. जैन, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.के. तातेड, बँक आॅफ बडोदाचे कार्यकारी संचालक एस.एल. जैन, मुनिश्री प्रमुख सागरजी, महासती कंचनकंवरजी, साध्वी कैलाशवतीजी आदी उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म, जाती, पंथ आहेत. पण भारतीय म्हणून विचार केल्यास सर्व भेद विसरून हा सारा समाज भारतीय होऊन जातो. अनेक ऋषी, मुनी, महात्मे यांच्या कठोर तपस्येमुळे देशाची निरंतरपणे प्रगती होत आहे. देशात आर्यकाळापासून ज्ञानाची प्रथा चालत आलेली आहे. समाजातील अनेक धर्मांचे लोक विविध देशांतून शिक्षण घेत असून या माध्यमातून ज्ञान प्राप्त करत आहेत. हे ज्ञान आता पूर्ण विश्वात पसरत आहे. सूर्य जसा जाती-पाती, धर्म, वंश न मानता सर्वांना समान प्रकाश देतो त्याचप्रकारे देशात जाती-पाती उच्च-नीच न मानता सर्व समान आहेत. क्षमा हे वीर माणसाचे भूषण असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने वीर बना, असेही त्यांनी या वेळी सांगितले. ऋषी, मुनींचा आशीर्वाद आणि उच्च आदर्शामुळे देश सशक्त व समर्थ बनेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
या वेळी मोतीलाल ओसवाल व देवेंद्र भाई यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जैन संघ रथयात्रेला सुरुवात
पर्युषण पर्वानिमित्त दक्षिण मुंबई येथे आयोजित जैन संघ रथयात्रेस आज राज्यपालांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. मुंबई जैन संघटनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जैन संघांचे साधू-साध्वी, नागरिक या वेळी उपस्थित होते. मुंबईत पहिल्यांदाच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील जैन समाजातील सर्व समूहांच्या गुरूंनी एकत्र येऊन समाजाला एकतेचा संदेश दिला. पर्युषणपर्वानिमित्त शुभेच्छा देताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, केवळ रूपवान, धनवान, बलवान असणे पुरेसे नाही, तर मनुष्याने क्षमावान असणे महत्त्वाचे आहे. या रथयात्रेच्या माध्यमातून मुंबईतील जैन बांधवांचा मोठा महासागर पाहावयास मिळाल्याचेही राज्यपाल म्हणाले.

Web Title: India's Way to Become World Grand - Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.