शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पाच वर्षात भारतीय रेल्वेचा कायापालट होणार - सुरेश प्रभू

By admin | Updated: July 16, 2017 17:47 IST

येत्या पाच वर्षात रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल असे सूतोवाच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी केले.

ऑनलाइन लोकमतपिंपरी-चिंचवड, दि. 16 - भारतीय रेल्वे जगातील सर्वोत्तम रेल्वे बनविण्यासाठी भरघोस आर्थिक तरतूदीद्वारेपायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे अर्थसंकल्प येत्या काही वर्षात २ लाख ७५ हजार कोटी रुपयांपर्यत वाढवून त्यानंतर रेल्वे क्षेत्राचा सर्व सर्वांगीण विकासासाठी आर्थिक तरतूद ८ लाख ७० हजार कोटी रूपयांपर्यत वाढविण्यात येईल. या सर्वांमुळे येत्या पाच वर्षात रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल असे सूतोवाच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी केले. 
         हिंजवडी आयटी पार्क येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझीनेस या संस्थेने रोप्यमहोत्सवी वर्षात प्रदार्पण केले त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हूनन ते बोलत होते. यावेळी  विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, थायसेनकृप इंडियाचे उपाध्यक्ष दारा दमानिया, एसआयआयबीच्या संचालिका डॉ. अस्मिता चिटणीस आजी-माजी विद्यार्थी व प्राध्यापक वृंद यावेळी उपस्थित होते. या वेळी प्रभू यांच्या हस्ते एसआयआयबीच्या "अविस्मरणीय"  या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.   
         प्रभू पुढे म्हणाले, जपान आणि चीनमध्ये ज्या पद्धतीने रेल्वेचा विकास सुरु आहे, त्या पद्धतीने देशात रेल्वेच्या विकासाला सुरूवात झाली असून मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते कोलकाता या रेल्वेमार्गांवर दोनशे किमी प्रतितास वेगाने प्रवासी रेल्वे चालिण्यासाठी प्रसत्न करण्यात येत आहे येत्या काळात प्र‍वाशांच्या समस्या व तक्रारी ‘रिअल टाइम’वर सोडविण्यावर अधिक भर दिला जाईल. " चीन आणि जपान या देशांनीपूर्वीपासून रेल्वे क्षेत्रात मोठी गुंतवणूक करीत त्यांच्या अर्थसंकल्पात त्यांनी रेल्वेसाठी भरघोस तरतूद केली आहे. त्या तुलनेत आपण मागे आहोत.  देशात ४० हजार रेल्वेडब्यांचे नूतनीकरण सुरु आहे. मीटरगेज रेल्वमार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर सुरू असून कालांतराने त्यांचे विद्युतीकरण करण्यात येईल. देशातील ४० ते ५० प्रमुख रेल्वेस्टेशन विमानतळासारखे करण्यावर भर दिला जाणार आहे. रेल्वेत ई-कॅटरिंग सर्व्हिसला प्रोत्साहन देण्यात येत आहे. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मी नेहमी आतुर असतो असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. 
 
  प्रभू यांच्या हस्ते उद्योजक अरुण फिरोदिया, संजय किर्लोस्कर, एस. के. जैन तसेच संस्थेच्या माजी संचालक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘ भारताला भ्रष्टाचार, गरिबी अशा विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासले असताना देशाला आधार कार्डाची नाही. तर, या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी देशात उत्तम दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या सुविधेची पुरविण्याची गरज आहे.’ डॉ. येरवडेकर यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या जडणघडणीचा आढावा घेत २५ वर्षाचे स्वप्न सत्यात उतरल्याचे सांगितले. मोठ्या हुद्यावर पोहचलेले माजी विद्यार्थी मुकेश कुमार, वेंकटेलसू. प यांनी मनोगंगात संस्थेचे रन व्यक्त केले. प्रसिद्ध कलाकार उस्ताद सुजात खान, पंडित रोणू मुजुमदार आणि पंडित अरविंद कुमार आझाद यांचा संगीत मेहफिलीच्या जुगलबंदीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.