शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अग्निवीर अक्षय गवते शहीद; जनरल मनोज पांडे यांच्सयाह सर्व अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 14:28 IST

बुलढाणा जिल्ह्यातील अक्षय लक्ष्मण गवते, ऑन ड्युटी शहीद झालेले पहिले अग्निवीर जवान आहेत.

Indian Army Agniveer: देशाचे रक्षण करण्यासाठी लाखो सैनिक सीमेवर तैनात आहेत. गेल्यावर्षी सरकारने अग्नीवीर योजनेद्वारे अनेकांची सैन्यात भरती केली. यातील एका अग्निवीर जवानाला देशाचे रक्षण करताना हौतात्म्य आले. लडाखच्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असलेले अग्निवीर (ऑपरेटर) अक्षय लक्ष्मण गवते यांना हौतात्म्य आले. ऑनड्युटी शहीद झालेले अक्षय पहिले अग्निवीर आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपगळगाव सराईचे रहिवासी अक्षय गवते (23) यांच्या हौतात्म्याबद्दल भारतीय लष्कराने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली. तसेच, या दुःखाच्या प्रसंगी आम्ही गवते कुटुंबासोबत खंबीरपणे उभे असल्याचेही सांगितले. दरम्यान, अक्षय यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती आहे. 

जनरल मनोज पांडे यांनी श्रद्धांजली वाहिलीसियाचीनच्या दुर्गम उंचीवर कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण यांना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि भारतीय लष्कराच्या सर्व स्तरातील अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. जवान अक्षय, कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यांचे आईवडील शेती करतात. मृत्यूची माहिती मिळताच पिंपळगाव सराईमध्ये शोककळा पसरली आहे. 23 ऑक्टोबर रोजी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

11 ऑक्टोबर रोजी एका अग्नीवीराची आत्महत्या दरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी अग्नीवीर अमृतपाल सिंग यांनी पुंछ सेक्टरमध्ये सेन्ट्री ड्युटीवर असताना आत्महत्या केली होती. लष्कराने अमृतपाल यांना गार्ड ऑफ ऑनर न दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. पण, आत्महत्यासारख्या परिस्थितीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जात नाहीत, असे सांगण्यात आले. दरवर्षी सुमारे 140 जवान आत्महत्या किंवा जखमी झाल्यामुळे आपला जीव गमावतात, असे लष्कराने म्हटले होते. अशा स्थितीत लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर दिला जात नाही.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानbuldhanaबुलडाणाAgneepath Schemeअग्निपथ योजनाMartyrशहीद