शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सुविधांवर भर दिला तर विदेशी उद्योगांसाठी भारत ठरेल प्रवेशद्वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:00 IST

Lokmat Global Economic Convention London 2025: देशात वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधांमुळेच आता विदेशातील मोठे उद्योग, गुंतवणूकदार सकारात्मक झाले आहेत. त्यामुळेच आगामी काळात विदेशी उद्योगांसाठी भारत प्रवेशद्वार ठरेल, असा विश्वास ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक्स कन्व्हेंशन’मध्ये मान्यवरांनी व्यक्त केला.

लंडन  - देशात वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधांमुळेच आता विदेशातील मोठे उद्योग, गुंतवणूकदार सकारात्मक झाले आहेत. त्यामुळेच आगामी काळात विदेशी उद्योगांसाठी भारत प्रवेशद्वार ठरेल, असा विश्वास ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक्स कन्व्हेंशन’मध्ये मान्यवरांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.चे माजी व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘पायाभूत सुविधा : भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार’ या परिसंवादात मान्यवरांनी भारत आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा वेध घेतला. या परिसंवादात न्याती ग्रुपचे चेअरमन डॉ. नितीन न्याती, अजंता फार्माचे व्हाइस चेअरमन मधुसूदन अग्रवाल, एमआयसीएल कन्स्ट्रक्शन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मनन शाह, ‘युएस’मधील शेलाडिया असोसिएटचे अध्यक्ष मनीष कोठारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, जे. कुमार एन्फ्राप्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक नलीन गुप्ता, सॉलिटीअर ग्रुपचे संचालक प्रमोद रांका यांचा सहभाग होता.

दीक्षित म्हणाले, सध्याची वेळ ही विकासासाठी मोठे आव्हान असून टॅरिफ पॉलिसीमुळे अनिश्चितता वाढली आहे. भारत ही वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असली तरी सध्याचा काळ हा बदलाचा आहे. भारतात सेमिकंडक्टर, डेटा सेंटरचे प्रकल्प येऊ घातले आहेत. तसेच ए.आय. तंत्रज्ञानाचीही नवी आव्हाने समोर आहेत.

यावेळी मधुसूदन अग्रवाल, नलिन गुप्ता,  अनिल गायकवाड, मनन शाह, प्रमोद रांका,  मनीष कोठारी यांनी भारत हा पायाभूत सुविधा उभारणी आणि विकासासाठी सक्षम आहे. मात्र सुविधा नसतील तर व्यवसाय सुलभतेने होत नाही. त्यामुळे पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या तरच हा देश झेपावेल. येणाऱ्या काळात भारत आर्थिक महासत्ता निश्चित होईल.

टॅग्स :Lokmat Global Economic Convention London 2025लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन, लंडन २०२५