शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
4
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
5
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
6
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
7
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
8
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
9
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
10
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
11
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
12
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
13
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
14
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
15
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
16
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
17
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
18
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
19
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
20
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर

हरितऊर्जा क्रांतीची भारताला गरज

By admin | Updated: March 25, 2015 02:05 IST

‘हरितक्रांती’नंतर देशामध्ये कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. त्याचप्रमाणे ऊर्जाक्षेत्रात ‘हरितक्रांती’ घडवून आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

नागपूर : ‘हरितक्रांती’नंतर देशामध्ये कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. त्याचप्रमाणे ऊर्जाक्षेत्रात ‘हरितक्रांती’ घडवून आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. लोकमत मीडिया प्रा.लि.तर्फे नागपूर (बुटीबोरी) येथील लोकमतच्या अद्ययावत मुद्रण प्रकल्पात उभारलेल्या ‘लोकमत ग्रीन एनर्जी पार्क’ या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण एका शानदार समारंभात राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी सकाळी झाले. ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा़ कृपाल तुमाने, माजी खासदार व ‘द हितवाद’चे व्यवस्थापकीय संचालक बनवारीलाल पुरोहित आदी प्रमुख अतिथी होते. या वेळी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी मनोगत व्यक्त करताना राज्यपाल राव म्हणाले, राज्यातील दुर्गम भागापर्यंत अद्याप वीज पोहोचली नसल्याने तेथे विकास रखडलेला आहे. या ठिकाणी सौरऊर्जेसारख्या ‘क्लीन व ग्रीन’ ऊर्जेचा जास्तीतजास्त वापर करण्याची आवश्यकता आहे. ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेत ‘लोकमत’ने पुढाकार घेतला व सौरऊर्जेची ऐतिहासिक गुढी उभारत अशा प्रकारचा प्रयोग राबविणारा देशातील पहिला वृत्तपत्रसमूह होण्याचा मान पटकाविला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. लोकमत नागपूर सोबतच औरंगाबादनजीकचा शेंद्रा येथील सौरऊर्जा प्रकल्पदेखील मंगळवारपासूनच कार्यान्वित झाला. देवेंद्र दर्डा यांनी प्रास्ताविकातून हा सौरऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यामागची ‘लोकमत’ची भूमिका व इतर बाबींवर प्रकाश टाकला. या वेळी माजी खा. बनवारीलाल पुरोहित यांनीही आपले विचार मांडले. (प्रतिनिधी)च्ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, लोकमतने सौरऊर्जा प्रकल्प उभारून देश व राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. मी ऊर्जामंत्री झाल्यानंतर हा पहिला प्रकल्प सुरू होत आहे. त्यामुळे राज्य सरकारतर्फे खास लोकमतचे अभिनंदन करण्यासाठी मी येथे आलो आहे. विदर्भात हे एक मोठे काम झाले आहे. आपण विधानसभा सभागृहात ही स्तुत्य बाब मांडू, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. याशिवाय देवेंद्र दर्डा यांनी केलेल्या सूचनादेखील सौरऊर्जा धोरणात अंतर्भूत केल्या जातील, असेही त्यांनी आश्वस्त केले. समाजहितासाठी ‘लोकमत’चा सदैव पुढाकार - देवेंद्र दर्डाच्लोकमतने उभारलेला हा सौरऊर्जा प्रकल्प तुलनेने मोठा नसला तरी आमचा उद्देश व त्यामागचा विचार नक्कीच मोठा आहे. आम्हाला ‘क्लीन व ग्रीन’ ऊर्जेचा प्रसार करायचा आहे. आशियातील सर्वांत मोठ्या औद्योगिक विकास महामंडळ परिसरात हा प्रकल्प कार्यान्वित करून आम्ही लोकांपर्यंत प्रदूषणमुक्त उद्योगाचा संदेश पोहोचवत आहोत, असे प्रतिपादन देवेंद्र दर्डा यांनी केले. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे़ त्यामुळे ऊर्जेचा सुरक्षित स्रोत वापरण्याची हीच योग्य वेळ होती. ‘लोकमत’च्या इतर १० मुद्रण प्रकल्पांतदेखील येत्या एक ते दोन वर्षांत सौरऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.