शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2017 : देशभरात उत्साहात साजरा होतोय स्वातंत्र्यदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 13:08 IST

राज्यासहीत देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. नवी मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त सीवूड ते बेलापूर -नवी मुंबई मनपाकार्यालयापर्यंत सायकल फेरी काढण्यात आली.  

मुंबई, दि.15 -  राज्यासहीत देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. नवी मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त सीवूड ते बेलापूर -नवी मुंबई मनपाकार्यालयापर्यंत सायकल फेरी काढण्यात आली.  

नाशिक : वडाळा गाव येथे जामा गौसिया मशिदीसमोरही स्वातंत्र्यदिन उत्स्फुर्तपणे साजरा करण्यात आला. मशिदीचे मुख्य इमाम धर्मगुरु मौलाना जुनेद आलम यांनी ध्वजारोहण केले. तर मदरसा गौसिया फैझान -ए-मदारमधील विदयार्थ्यांनी राष्ट्रीयध्वजाला सलामी दिली. यावेळी देशाच्या एकता, प्रगती आणि संरक्षणासाठी सामूहिक दुवा करण्यात आली.

नाशिकरोड विभागीय कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केले.  दरम्यान यावेळी समृद्धीविरोधी कृती समितीच्या वतीने पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण न करता शेतक-यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची मागणी केली होती. शिवाय, महाजन यांना रोखण्यात येणार असल्याने आंदोलकांना सोमवारी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देण्यात आली होती आणि ध्वजारोहण कार्यक्रमाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.