शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वाढत्या उन्हाने पशू-पक्ष्यांची लाहीलाही

By admin | Updated: April 3, 2017 02:38 IST

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाला आहे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाला आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्म्याचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा बळी ठरलेले कावळे, कबुतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांवर सध्या परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी त्यांच्यासाठी घराबाहेर पाणी ठेवण्याचे आवाहन माजी लष्कर पशूवैद्यक व बैलघोडा रूग्णालयाचे सचिव कर्नल डॉ. जे.सी. खन्ना यांनी केले आहे.उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्था यामुळे मुंबईकर त्रस्त झाला आहे. या त्रासातून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा आधार घेताना दिसत आहे. मात्र वाढत्या उष्म्याने त्रस्त पशू-पक्ष्यांचे काय, असा प्रश्न साहजिकच मनात येतो. वाढत्या उष्म्याने पशू-पक्ष्यांना होणाऱ्या त्रासाबाबत बोलताना परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. जे.सी. खन्ना यांनी सांगितले की, वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणे पशू-पक्ष्यांवरही होतो. ड्रीहायड्रेशन, त्वचारोग, हीटस्ट्रोकने त्यांची अवस्था बिकट होते.गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसांप्रमाणेच पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. उन्हाळ्यात माणसाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्राव होतो, तर काहींना हीटस्ट्रोकही येतो. माणसांत दिसून येणारी ही लक्षणे प्राण्यांमध्येही दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशू-पक्षी सावलीत बसतात; मात्र सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्म्यापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्म्याचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. त्यांना दम लागतो. तसेच हीटस्ट्रोक होतो़ भोवळ येऊन ते पडतात, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हिरवळीचा अभावउन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी झाडांच्या सावलीचा आधार घेतात, मात्र अलीकडे मुंबईतील हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आधार शोधावा लागत आहे, अशी खंत डॉ. खन्ना यांनी व्यक्त केली. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणादरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य, असा आहार द्यावा.अशी घ्या काळजी! : घरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळ घरातील चार भिंतीत असतात. घरातील तापमान आणि बाहेरील तापमानात फरक असतो. या प्राण्यांना सारखे घराबाहेर घेऊन गेले की, ते अस्वस्थ होतात. ज्या घरांत एसी आहे, अशा घरातील प्राण्यांना घराबाहेर लगेच नेल्यास त्यांनाही उष्म्याचा त्रास होतो. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटक्यासाठी घेऊन जावे. पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.६८ पशू-पक्षी रुग्णालयात दाखलमागच्या दोन दिवसांत परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात २८ कबूतर, ४ पोपट, १ घुबड, ८ घार, १ बगळा, ३ कावळे, १ पाणकोंबडी, १२ कुत्रे, ८ मांजर आणि २ वासरू दाखल झाल्याची माहिती डॉ. खन्ना यांनी दिली.रुग्णालयात ‘वॉटरपॉइंट’डॉ. खन्ना यांनी पक्ष्यांना पाणी पिण्यास मिळावे म्हणून दोन झाडांच्या आधारे बांबूला तीन भांडी अडकवून वॉटरपॉइंट केला आहे. यात एका भांड्यात पाणी, एका भांड्यात धान्य आणि तिसऱ्या भांड्यात गवत, कापूस ठेवून छोटासा बेड करण्यात आला आहे. यात वॉटरपॉइंटवर पाणी पिण्यासाठी अनेक पक्षी येतात असेही डॉ. खन्ना यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे निवासी वसाहती, पालिकाने या स्तरांवरही अशा छोट्या-छोट्या वॉटरपॉइंट्सची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी केली.