मुंबई : मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना सलग दोन आठवडे मल्टिप्लेक्स मालकांनी एकूण उत्पन्नाच्या ४५ टक्के हिस्सा देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. मराठी चित्रपटांना दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद लाभत असल्याने उत्पन्न वाढीची चित्रपट निर्मात्यांची मागणी होती. यापूर्वी केवळ पहिल्या आठवड्यात ४५ टक्के तर दुसऱ्या आठवड्यात ४० टक्के उत्पन्न हिस्सा दिला जात होता.मल्टिप्लेक्स मालक व मराठी चित्रपट निर्माते यांच्यात उत्पन्नाच्या विभागणीवरून झालेल्या वादासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या वेळी मराठी चित्रपटांना प्राइम टाइम देण्यास मल्टिप्लेक्स मालकांनी अनुमती दिली. आता उत्पन्न वाटपाचा फॉर्म्युला बदलला आहे. एकूण उत्पन्नाच्या ४५ टक्के उत्पन्न पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात देतील. तिसऱ्या आठवड्यात पूर्वीप्रमाणेच ३५, तर चौथ्या आठवड्यात ३० टक्के उत्पन्न देणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)मराठीला फायदाआतापर्यंत मराठी चित्रपट निर्मात्यांना मल्टिप्लेक्स मालक एकूण उत्पन्नाच्या पहिल्या आठवड्यात ४५ टक्के, दुसऱ्या आठवड्यात ४० टक्के, तिसऱ्या आठवड्यात ३५ टक्के तर चौथ्या आठवड्यात ३० टक्के उत्पन्न देत होते.
निर्मात्यांना वाढीव उत्पन्न
By admin | Updated: May 6, 2015 03:37 IST