शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये क्षयाचा वाढता धोका; कोरोनानंतर निदानात झाली वाढ

By स्नेहा मोरे | Updated: April 13, 2022 08:31 IST

राज्यात कोरोनामुळे क्षयरोग निदानात खंड पडल्याचे समोर आले. कोरोना आणि क्षयरोग यासारख्या संसर्गजन्य आजाराचे लक्षणे जवळपास सारखी असल्याने बऱ्याच रुग्णांवर कोरोना कालावधीत कोरोनाचे उपचार केले गेल्याने क्षयरोगाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली.

स्नेहा मोरेमुंबई :राज्यात कोरोनामुळे क्षयरोग निदानात खंड पडल्याचे समोर आले. कोरोना आणि क्षयरोग यासारख्या संसर्गजन्य आजाराचे लक्षणे जवळपास सारखी असल्याने बऱ्याच रुग्णांवर कोरोना कालावधीत कोरोनाचे उपचार केले गेल्याने क्षयरोगाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली. त्यामुळेच क्षयरोगाच्या रुग्ण संख्येत प्रचंड घट झाल्याचे दिसून आले होते. आता पुन्हा एकदा यात वाढ झाली असून, सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२० च्या तुलनेत २०२१ साली तीन हजार बाल क्षयरोग रुग्णांची नोंद झाली आहे. तर २०२२ मध्ये तीन महिन्यांत ३ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

लहान मुलांना भूक लागत नाही, वजन वाढत नाही, महिनाभराहून अधिक काळ ताप आदी लक्षणांसाठी खासगी डॉक्टरांकडे वा बालरोगतज्ज्ञांकडे आणण्यात आले तर त्वरित क्षयरोग निदान चाचणी व्हायला हवी, असे श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अमित राणावत सांगतात. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. क्षयरोगाच्या निदान चाचण्या व त्यानंतर नियमावलीनुसार त्वरित उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे लहान मुलांमध्ये क्षयरोग बळावतो. तर केवळ औषधे देऊन रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

अस्वच्छ वस्त्या, दाट लोकवस्ती, प्रदूषण, कोंदट हवामान, कुपोषण, चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी मुंबईतल्या मुलांना क्षयरोगाची लागण होते. घरात क्षयग्रस्त व्यक्ती असल्यास किंवा तो होण्याची शक्यता असलेल्या परिसरात वावरल्यास लहान मुलांना टीबीचा संसर्ग तत्काळ होतो. कुपोषित आणि अशक्त मुलांना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉ. कैवल्य पुरोहित यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य