निरगुडसर : महावितरण कंपनीने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील निरगुडसर, जवळे, भराडी, जारकरवाडी, मेंगडेवाडी व पारगाव परिसरातील नागरिकांना जून महिन्यातील घरगुती वापराची वीजबिले वाढीव रकमेने दिल्याने महावितरण कंपनीचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे़ जून महिन्यात वापरलेल्या वीजबिलांचे वितरण सध्या कंपनीकडून करण्यात येत आहे़ परंतु, चुकीच्या पद्धतीने रीडिंग घेतले गेल्याने ५००० हजार रुपयांहून अधिक रकमेची घरगुती वापराची बिले ग्राहकांना आली आहेत़ भराडी येथील नथू भिमाजी गावडे यांच्या घराबाहेर सेन्सॉर मीटर बसवला आहे़ तरीही त्यांच्या बिलावर मीटर फ ोटोऐवजी दुसऱ्याच कोणाच्या तरी घराचा कुलूप लावलेला फ ोटो मीटरच्या जागी आला आहे. वीजबिल अंदाजे वाढीव लागून आले आहे़ अनेक नागरिकांच्या बिलावर मागील रीडिंग शून्य दाखवत असून चालू रीडिंग पाचशे ते सहाशे असे वाढीव आले आहे.सर्व ठिकाणी सेन्सॉर मीटर घराबाहेर बसवण्यात आलेले आहेत. रीडिंग घेणाऱ्याकडून जाणीवपूर्वक गहाळपणा करून लॉक दाखवले जात आहे़ रीडिंग घेताना झालेला गैरप्रकार नागरिकांना मनस्ताप देणारा आहे. त्यामुळे स्थानिक वायरमनला मीटर दाखवून सही घेतल्याशिवाय वीजबिल कमी होत नाही़ अभियंत्याच्या सहीने कमी केलेले बिल सिस्टिमला बदलावे लागते. नाहीतर परत पुढील महिन्यात वाढीव बिल लागून येते़ दर महिन्याला हा त्रास ठरलेलाच असतो़ त्यामुळे महावितरण कं पनीने आपल्या कारभारात बदल करावा, रीडिंग यंत्रणा सक्षम करावी व कमी केलेल्या बिलांचा सिस्टिमला बदल करून घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़ (वार्ताहर)
निरगुडसर परिसरात वाढीव बिलाचा शॉक
By admin | Updated: July 20, 2016 01:38 IST