शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

युएलसी घोटाळा: आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; पसार आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 19:54 IST

भाईंदर येथील बनावट युएलसी प्रमाणपत्र वापरून शासनाची १०२ कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी तीन अटक आरोपीं ची पोलीस कोठडी सोमवारी ठाणे न्यायालयाने १६ जून पर्यंत वाढवून दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरा रोड: भाईंदर येथील बनावट युएलसी प्रमाणपत्र वापरून शासनाची १०२ कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी तीन अटक आरोपीं ची पोलीस कोठडी सोमवारी ठाणे न्यायालयाने १६ जून पर्यंत वाढवून दिली आहे. तर पसार झालेले मीरा भाईंदर महापालिकेचे नगररचनाकार दिलीप घेवारे यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे.

भाईंदर येथील ५ जमिनींच्या विकासासाठी बनावट व खोट्या यूएलसी प्रमाणपत्र चा वापर करून इमारती बांधून विकण्यात आल्या आहेत. रहिवास क्षेत्र असताना हरित क्षेत्र दाखवून यु एल सी मधून सवलत मिळवण्यासाठी बनावट व खोटी प्रमाणपत्रे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील यूएलसी विभागा तील अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनवण्यात आली. याप्रकरणी तक्रार झाल्यावर २०१६ साली गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली होती.  बनावट युएलसी प्रमाणपत्र द्वारे शासनाला १०२ कोटी रुपयांचा चुना या अधिकारी, विकासक व मध्यस्थांमार्फत लावण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु नंतर मात्र तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मुळे सदर गुन्ह्याचा तपास थांबवण्यासह यातील मुख्य सूत्रधार व अन्य आरोपींना मात्र पाठीशी घालण्यात आले प्रकरणी पोलीस महासंचालकांसह शासनाकडे तक्रारी झाल्या. त्यानंतर ठाणे शहर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांनी पुन्हा तपास सुरू केला. तपासात मीरा भाईंदर महापालिकेचे निवृत्त नगररचनाकार सत्यवान धनेगावे,  वास्तुविशारद चंद्रशेखर लिमये व सध्या पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले भरत कांबळे या तिघांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली होती.  ठाणे न्यायालयाने त्यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. 

आज सोमवारी ठाणे न्यायालयात या तिन्ही आरोपींना हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत १६ जुन पर्यंत वाढ केली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी व सध्या मीरा-भाईंदर महापालिकेत नगर रचनाकार पदी कार्यरत दिलीप घेवारे यांचा पोलीस शोध घेत असले तरी ते अजून पोलिसांच्या हाती सापडले नाही. 

सोमवारी घेवारे यांच्या वतीने ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यास सरकारी वकील हिरे व तक्रारदाराच्या वकिलांनी हरकत घेतली. सोमवारी न्यायालयाने घेवारे यांना अटकपूर्व जामीन दिला नसून मंगळवारी त्यावर सुनावणी ठेवण्यात आली आहे. 

घेवारे यांनी २००३ - २००४ या काळात ठाणे नगररचना विभागात असताना ६७ लाख ५० हजार रुपये घेऊन ही बनावट प्रमाणपत्रे मिळवून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शासनाच्या १०२ कोटी रुपये फसवणुकीचा आकडा केवळ ५ जमीन प्रकरणातील असून आणखी १२ जमीन प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCrime Newsगुन्हेगारी