शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, रुग्णवाढीचा दर तीन टक्के, आरोग्यमंत्र्यांचे परिषदेत निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 05:40 IST

राज्यात कोरोना, एच१ एन१, एच३ एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढू लागल्याबाबत निवेदन करण्याची सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली होती.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रुग्णवाढीचा दर सुमारे तीन टक्के इतका आहे. एच१एन१, एच३एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली.   

राज्यात कोरोना, एच१ एन१, एच३ एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढू लागल्याबाबत निवेदन करण्याची सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली होती. त्यानुसार आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, की राज्यात आतापर्यंत एच१ एन१ बाधितांची संख्या ४०५ आहे. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एच३ एन२ बाधित रुग्णांची संख्या १९५ असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ३०८ इतकी आहे. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर, ४ हजारपेक्षा जास्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले आहे. गंभीर, आजारी, वृद्ध यांना तर आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरण केले आहे. प्रत्येक जिल्ह्यांचे सर्वेक्षण आणि लसीकरण, बूस्टर डोस देण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आदेश दिले आहेत. लस घेण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी वितरित केला आहे, असे सांगितले. 

मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे टाळाराज्यात सध्या हंगामी साथीच्या आजाराची लक्षणेही रुग्णांमध्ये दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, मास्क वापरा, दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर ठेवा, हात सॅनिटायझरने स्वच्छ ठेवा, गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.   

ऑक्सिजनचा पुरेसा साठाराज्यात ५२३ ऑक्सिजन प्लांट असून ५५२ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती केली जाऊ शकते. ३७० एमएलडी लिक्विड ऑक्सिजन टँक, ५६ हजार ५५१ जम्बो सिलिंडर, २० हजार छोटे सिलिंडर्स, १ हजार ड्युरा सिलिंडर्स आहेत. उपचारांसाठी १ हजार ५८८ कोरोना रुग्णालये आहेत. विलगीकरण खाटा ५१ हजार ३६५, ऑक्सिजन बेड ४९ हजार ३९६, आयसीयू बेड १४ हजार ३९५, तर व्हेंटिलेटर बेड ९ हजार २३६ आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVidhan Parishadविधान परिषद