शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

अभिमत महाविद्यालयांतील वैद्यकीय शिक्षण झाले महाग; विद्यार्थी, पालकांची चिंता वाढली

By अविनाश कोळी | Updated: July 18, 2025 18:22 IST

वार्षिक शुल्क पाच ते साडेसात टक्के वाढले

अविनाश कोळीसांगली : कर्नाटक वगळता महाराष्ट्रासह देशभरातील सर्व अभिमत वैद्यकीयमहाविद्यालयांच्या वार्षिक फीमध्ये १ ते ५ लाखांची वाढ झाली आहे. वसतिगृह आणि मेसच्या फी मध्येही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय इतर अनेक प्रकारचे शुल्क पालकांकडून घेतले जात असल्याने अभिमत महाविद्यालयातीलवैद्यकीय शिक्षण आणखी महाग होणार आहे.बहुतांश अभिमत वैद्यकीय महाविद्यालयांची शैक्षणिक फी वर्षाला वीस लाखांहून अधिक आहे. काही महाविद्यालये दरवर्षी वार्षिक शुल्कात ५ ते ७.५ टक्क्यांपर्यंत वाढ करतात. अशा महाविद्यालयातून एमबीबीएस करायचा एकूण खर्च आता १ ते २ कोटी रुपयांच्या घरात आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे १० लाख फी असणाऱ्या पुण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयाने ही यावर्षापासून फीमध्ये दरवर्षी १० टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे. अन्य महाविद्यालयांनी ही वार्षिक २.५ ते साडे सात टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे.अन्य खर्चाचा भारही वाढणारमहागड्या अभिमत महाविद्यालयात होस्टेल आणि मेसची फी प्रतिवर्ष दोन ते साडेतीन लाखांच्या घरात असते. याशिवाय प्रवेश घेताना विद्यापीठ फी आणि परीक्षा फी म्हणून मोठी रक्कम भरावी लागते. त्यामुळे अशा ठिकाणी वैद्यकीय शिक्षणाची एकूण फी साधारणपणे दीड ते २ कोटींच्या घरात जात आहे.

एकूण ५७ अभिमत वैद्यकीय महाविद्यालयेदेशभरात एकूण ५७ अभिमत महाविद्यालये आहेत. यात महाराष्ट्रात १४ अभिमत महाविद्यालये आहेत. महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमधील अभिमत वैद्यकीय महाविद्यालयांनी ही शुल्कवाढ केली आहे. कर्नाटकमधील बहुतांश अभिमत महाविद्यालयांनी शुल्कवाढ केली नाही.

अभिमत महाविद्यालयांच्या फीमध्ये इतकी प्रचंड वाढ झाल्याने, या महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न आता मध्यमवर्गीयांच्या ही आवाक्याबाहेर गेले आहे. ज्याठिकाणी फी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तिथे अत्यंत कमी गुणांच्या विद्यार्थ्यांनाही वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळणार आहे. या फीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश समुपदेशक, सांगली