शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीग्रस्तांच्या मदतीत वाढ, केंद्र सरकारचे निकष राज्य सरकारने स्वीकारले, मंत्रिमंडळाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 10:47 IST

निर्णय रविवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ)साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आपत्तीग्रस्तांच्या मदतीत भरघोस वाढ झाली आहे. तसेच या निर्णयांची अंमलबजावणी १ नोव्हेंबर, २०२२ पासून होणार आहे.

सुधारित दर पुढीलप्रमाणे (कंसात जुने दर) :   मृतांच्या कुटुंबीयांना - ४ लाख रुपये (बदल नाही). चाळीस ते ६० टक्के अपंगत्व आल्यास-७४ हजार रुपये (५९ हजार १००). साठ टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास-२.५० लाख रुपये (२ लाख).  जखमी व्यक्ती इस्पितळात एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी-१६ हजार रुपये (१२ हजार ७००), एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी-५ हजार ४०० (४ हजार ३००).   दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र / घर पाण्यात बुडालेले असल्यास / घरे पूर्णत: वाहून गेली असल्यास / पूर्णत: क्षतिग्रस्त झाल्यास प्रति कुटुंब-२ हजार ५०० (बदल नाही). सामानाच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब-२ हजार ५०० (बदल नाही).   पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या / कच्च्या घरांसाठी सखल भागात-१ लाख २० हजार रुपये (९५ हजार १००). दुर्गम भागातील घरांसाठी-१ लाख ३० हजार (१ लाख १ हजार ९००). अंशत: पडझड पक्क्या घरांसाठी-६ हजार ५०० (५ हजार २००). अंशत: पडझड कच्च्या घरांसाठी-४ हजार रुपये (३ हजार २००). झोपडीसाठी-८ हजार रुपये (४ हजार १००).  मृत दुधाळ जनावरांसाठी - ३७ हजार ५०० (३० हजार), वासरू, गाढव, खेचर आदीसाठी-२० हजार रुपये (१६ हजार रुपये). मेंढी, बकरी, डुक्कर यासाठी-४ हजार रुपये (३ हजार). कुक्कुटपालन - १०० रुपये प्रति कोंबडी, दहा हजार रुपयांपर्यंत (५० रुपये प्रति कोंबडी, ५ हजार रुपयांपर्यंत).   शेती जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी - ८ हजार ५०० रुपये, २ हेक्टर मर्यादेत (६ हजार ८००). आश्वासित सिंचनाखालील पिकांसाठी-१७ हजार रुपये प्रति हेक्टरी (१३ हजार ५००).   शेतजमिनीच्या नुकसानीसाठी - १८ हजार रुपये प्रति हेक्टरी (१२ हजार २०० रुपये). दरड कोसळून किंवा जमीन खरडून झालेल्या नुकसानीसाठी - ४७ हजार रुपये, प्रति हेक्टरी. (३७ हजार ५००)  मत्स्य व्यवसाय - बोटींच्या अंशतः दुरुस्तीसाठी-६ हजार रुपये (४ हजार १००). अंशतः बाधित जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी-३ हजार रुपये (२ हजार १००). पूर्णतः नष्ट बोटीकरिता-१५ हजार रुपये (९ हजार ६००). पूर्णतः नष्ट जाळ्यांसाठी-४ हजार रुपये (२ हजार६०० रुपये).