शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्तांच्या मानधनात 6 हजार रूपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 19:44 IST

महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्त असलेल्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात प्रती महिना 6 हजार रूपये वाढ करण्यात आली आहे.

मुंबई - महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्त असलेल्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात प्रती महिना 6 हजार रूपये वाढ करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशिक्षणार्थींच्या मागणीनुसार हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ 1500 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना होणार आहे.महानिर्मितीत पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांना आयटीआय  नंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून समावून घेण्यात येते. सध्या आयटीआय प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना सुरूवातीच्या 3 वर्षासाठी 8000 रूपये आणि 3 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाल्यानंतर 10,000 रूपये विद्यावेतन देण्यात येते. प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना दरवर्षी 500 रूपये वेतनवाढ देण्यात येते.आयटीआयधारक प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना औष्णिक वीज केंद्रतील कंत्राटी कामगारांप्रमाणे किमान वेतन मिळण्याची विनंती ऊर्जामंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार ही मागणी मान्य करण्यात आली. महानिर्मितीत कुशल, अर्धकुशल व अकुशल अशी वर्गवारी करण्यात येते.प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून 5 वर्षा पेक्षा अधिक कालावधीची सेवा झाली असलेल्या प्रशिक्षणार्थीला सध्या 10,000 रूपये मानधन मिळते. त्यात वाढ करण्यात  येऊन 16 हजार करण्यात आले. दोन ते 5 वर्ष सेवा झालेल्या प्रशिक्षणार्थीला सध्या 9000 रूपये मिळत होते. त्यात वाढ करून हे मानधन 15000 रूपये करण्यात आले. 2 वर्षापर्यंत सेवा कालावधी झालेल्या प्रशिक्षणापर्यंत आतापर्यंत 8000 रूपये मानधन देण्यात येत होते. आता ते 14 हजार रूपये करण्यात आले.एकूण 1500 प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात प्रत्येकी 6 हजार रूपये वाढ करण्यात आली. 5 वर्षांपेक्षा अधिक  सेवा असणारे प्रशिक्षणार्थी 235 आहेत. दोन व पाच वर्षाच्या कालावधीत सेवा देणारे 759 प्रशिक्षणार्थी आहेत. 2 वर्षे सेवेत असणारे प्रशिक्षणार्थी 518 आहेत. या सर्व  प्रशिक्षणार्थींच्या मानधनावर सध्या 1 कोटी 33 लाख रूपये खर्च होत होता, ते आता 2 कोटी 23 लाख रूपये होईल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र